शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळेच्या संरक्षक भिंतीचे दोन तुकडे

By admin | Updated: June 30, 2017 16:11 IST

समुद्राच्या वाढलेल्या उधाणाचा परिणाम

आॅनलाईन लोकमतगणपतीपुळे , दि. ३0 : गणपतीपुळे तीर्थक्षेत्री उधाणामुळे महाकाय येणाऱ्या लाटांनी पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केल्याचे दिसून येत होते. मात्र, गेले दोन दिवस समुद्राच्या वाढलेल्या उधाणामुळे मंदिर परिसरात बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचे दोन तुकडे झाले. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सध्या तुरळक गर्दी पाहावयास मिळत असून, गेले दोन दिवस समुद्राला आलेल्या उधाणामुळे पाणी अगदी या ठिकाणी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवर आपटून मंदिरापर्यंत येत असल्यामुळे लाटेची मज्जा अनेक पर्यटकांनी घेतली. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात उंच उडणाऱ्या लाटा अगदी गणपतीपुळे देवस्थानच्या संरक्षक भिंतीला लागत होत्या. भिंतीच्या आतून अनेक पर्यटक या लाटांचे दृष्य आपल्या मोबाईलमध्ये टिपताना दिसत होते. काही हौशी पर्यटक या उंच उडणाऱ्या लाटा अंगावर झेलताना दिसत होते. समुद्र खवळलेला असल्यामुळे व लाटा उंचच उंच उडत असल्यामुळे या परिसरात कोणीही आंघोळीसाठी जाऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून समुद्र चौपाटीवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. दिवसभर हे सुरक्षरक्षक डोळ्यात तेल घालून कामगिरी बजाविताना दिसत होते. कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी समुद्र चौपाटीवर संरक्षक कठड्यावर पेट्रोलिंग करताना हे सुरक्षा रक्षक दिसून येत होते. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात गेले दोन दिवस समुद्राला आलेल्या उधाणामुळे या परिसरात समुद्राच्या उंच लाटा अगदी काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या संरक्षण कठड्यावर आपटत होत्या. याच संरक्षण कठड्यावर पर्यटकांना बसण्यासाठी बाकेही लावण्यात आली आहेत. मात्र, गेल्या वर्षी अशाच आलेल्या समुद्राच्या उधाणामुळे या कठड्याच्या अनेक पायऱ्या वाहून गेल्या होत्या. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे मत व्यक्त होत आहे. या संरक्षण कठड्याचे सार्वत्रिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर दोन तुकडे झाल्याने कामाचा दर्जा समोर आला आहे.