शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Chaturthi 2018 : रोबोटच्या तोंडातून आरत्या देणारे चलचित्र, लक्षवेधी देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:49 IST

चिपळूण नगर परिषद कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी प्रबोधनात्मक, पौराणिक कथेवर आधारित सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखावे साकारले जातात. यावर्षी नगर परिषदेने रोबोटच्या तोंडातून गणरायाच्या आरत्या व सामाजिक संदेश देणारा चलचित्र देखावा साकारला आहे.

ठळक मुद्देरोबोटच्या तोंडातून आरत्या देणारे चलचित्र, लक्षवेधी देखावा चिपळूण नगर परिषदेचा आगळा उपक्रम

चिपळूण : चिपळूण नगर परिषद कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी प्रबोधनात्मक, पौराणिक कथेवर आधारित सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखावे साकारले जातात. यावर्षी नगर परिषदेने रोबोटच्या तोंडातून गणरायाच्या आरत्या व सामाजिक संदेश देणारा चलचित्र देखावा साकारला आहे.नगर परिषद कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ६ फुटी दगडूशेठ हलवाई गणरायाची प्रतिकृती असलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी मंडळातर्फे वेगवेगळे देखावे सादर करुन समाजाला चांगला संदेश देण्याचे काम मंडळ करत आहे.सध्या स्पर्धेच्या युगात अडकलेल्या मानवाची परिस्थिती मंडळाने चलचित्राच्या माध्यमातून सादर केली आहे. यात आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा शिक्षणासाठी बाहेरगावी जातो. त्यानंतर तेथे नोकरी करतो व विवाहही करतो. तोपर्यंत आई-वडील वृध्द होतात.

यादरम्यान आलेल्या गणेशोत्सवासाठी त्याला दूरध्वनी करुन बोलावले जाते. मात्र, आता मला येण्यास जमणार नाही, असे तो सांगतो. पूजा करण्यासाठी रोबोट आणा, असे सांगतो. त्यामुळे माणसे जोडा, असा संदेश मंडळाने रोबोटच्या माध्यमातून दिला आहे.

हा चलचित्र देखावा येथील जादूगार प्रसाद ओक यांनी साकारला असून, दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती मूर्तीकार राकेश कदम यांनी साकारली आहे.यासाठी मंडळाचे अध्यक्ष बापू साडविलकर, उपाध्यक्ष संतोष शिंदे, सचिव रविकांत सातपुते, खजिनदार वसंत निवाते, सल्लागार वलीद वांगडे, अनंत मोरे, शैलेश संसारे, कविता खंदारे, विलास बुरटे, सागर कदम, सचिन शिंदे, तुकाराम बेचावडे, विनायक सावंत, मोहन गोलामडे, दत्ताराम लोलम परिश्रम घेत आहेत.१९८०ची परंपराचिपळूण नगर परिषद कर्मचारी सार्वजनिक मंडळाची १९८० साली स्थापना झाली. लोकमान्य टिळकांनी समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात केली. ही परंपरा चिपळूण नगर परिषदेने आजही जपली आहे. दरवर्षी काहीतरी वेगळेपण जपण्याचा हे मंडळ प्रयत्न करते.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ratnagiriरत्नागिरी