शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

Ganesh Chaturthi 2018 : रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तगण दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:18 IST

ढोल - ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती, तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीत पुढील १२ दिवस आता गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येणार आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणपतीची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.

ठळक मुद्देरत्नागिरी  जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह, भक्तगण दाखलभक्त भक्तीरसात न्हाले : १ लाख ६५ हजार मूर्तींची प्रतिष्ठापना

रत्नागिरी : ढोल - ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती, तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीत पुढील १२ दिवस आता गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येणार आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणपतीची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी अवघा भक्तगण उत्साही झाला होता. गेल्या दोन दिवसात मुंबईकरांचेही मोठ्या संख्येने आगमन झाले असून, गेले चार दिवस एस. टी., रेल्वे, खासगी गाड्यातील गर्दी ओसंडून वाहत आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे. चारचाकी खासगी वाहनांनी तसेच दुचाकीनेदेखील मुंबईकर गावी आले आहेत.गुरुवारी सकाळपासूनच अनेक ठिकाणी मिरवणुकीने गणेशमूर्ती घरोघरी नेण्यात आल्या. लांबच्या ठिकाणी असलेल्या अनेकांनी गणेशमूर्ती आदल्या दिवशीच मिरवणुकीने घरी नेल्या होत्या. मात्र तरीही दुपारपर्यंत गणेशमूर्ती मिरवणुका सुरू होत्या.गणेश चतुर्थीनिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयांना एक दिवस सुट्टी असून, खासगी कार्यालयेही सणानिमित्त बंद होती. त्यामुळे सकाळपासून बाजारात शुकशुकाट होता.

सायंकाळी बाजारात चिबूड, काकडी, फळे, भाज्या विक्रेत्यांनी गर्दी केली होती. ऋषी पंचमीचे व्रत अनेक भाविक करीत असतात. यादिवशी केवळ मानवी श्रमाने पिकविलेले धान्य, भाज्यांचा आस्वाद घेतला जातो. त्यामुळे खास ऋषी पंचमीसाठी लागणारे तांदूळ, भाज्या विके्रत्यांनी गर्दी केल्याने बाजारात ग्राहकवर्गाचीही बऱ्यापैकी गर्दी झाली होती.भक्तगण उशिरापर्यंत प्रवासातमुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यात आले असले तरीही काही ठिकाणी महामार्गाची स्थिती नाजूकच आहे. तसेच वाहतूक कोेंडीमुळे अनेक भक्तगण सायंकाळी उशिरापर्यंत दाखल होत होते. त्यामुळे आज गणेश चतुर्थी असतानाही ग्रामीण भागाकडे जाणाºया बसेस मुंबईकरांच्या गर्दीने फुल्ल झाल्या होत्या.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ratnagiriरत्नागिरी