शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात नातूंचा पुन्हा पराभव, जाधव विजयी

By admin | Updated: October 20, 2014 00:58 IST

भाजपच्या विनय नातूंचा ३२ हजार ७६४ मतांनी पराभव

गुहागर : गुहागर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांनी भाजपच्या विनय नातूंचा ३२ हजार ७६४ मतांनी पराभव केला. माजी खासदार निलेश राणे यांनी जाधव यांच्या पराभवासाठी कंबर कसली होती. मात्र त्यानंतरही जाधव यांनी एकतर्फी विजय मिळवला.निवडणूक आयोगाच्या वेळेनुसार सकाळी ८ वाजता गुहागर रंगमंदिर येथे गुहागर मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली. भास्कर जाधव यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेले मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिले. पहिल्या दोन फेऱ्यांतच प्रत्येकी एक हजारचे व चौथ्या फेरीमध्ये तब्बल तीन हजारांचे मताधिक्य घेतले. पुढे एक ते दोन हजारांचे मताधिक्य कायम राहिले. अकराव्या फेरीमध्ये भास्कर जाधव ३४ हजार ७६३ मते घेऊन तब्बल १६ हजार २०३ मतांनी आघाडीवर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात होऊन जल्लोष साजरा करण्याची सुरुवात झाली. आपल्या उमेदवाराचा पराजय निश्चित झाल्याचे स्पष्ट होताच मतमोजणी पाहणीसाठी नेमणूक केलेल्या शिवसेना तालुकाध्यक्ष महेश नाटेकर यांच्यासह शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.गुहागर मतदारसंघासाठी एकूण १ लाख ५२ हजार ४० मतदान झाले. यामध्ये १ हजार ६१३ एवढे नोटा मतदान झाले. प्रत्येक फेरीमध्ये ५० ते १०० सरासरी नोटांचा वापर मतदारांनी केला. ६०६ एवढे पोस्टल मतदान झाले. अनेक कर्मचाऱ्यांनी मतदान फॉर्मवर ओळख न दिल्याने तब्बल ५१ मते बाद झाली. सहाव्या फेरीपर्यंत शिवसेनेचे विजयकुमार भोसले दुसऱ्या क्रमांकावर होते. यानंतर नातूंनी मिळालेले मताधिक्य कायम ठेवत दुसरा क्रमांक कायम ठेवला. १०व्या व ११व्या फेरीला मतदानयंत्रामध्ये तांत्रिक बिघाड आल्याने काहीवेळ मतमोजणी थांबवण्यात आली होती. हा बिघाड दूर केल्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरळीतपणे चालू झाली.मतमोजणी प्रक्रिया संपल्यानंतर दुपारी ११.३० वाजता सर्व उमेदवारांची मिळालेली मते जाहीर करत भास्कर जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर भास्कर जाधव यांना निवडणूक अधिकारी जयकृष्ण फड यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले. (प्रतिनिधी)