शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शुभम सावंतवर अंत्यसंस्कार

By admin | Updated: October 17, 2014 00:40 IST

हुडहुड’ग्रस्त भागात शहीद : माजगाव लोटले अंत्ययात्रेत

सावंतवाडी : आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारपट्टीवर आलेल्या ‘हुडहुड’ या चक्रीवादळामुळे विशाखापट्टणम येथे नुकसान झालेल्या भागात मदतकार्य पोहोचविताना सावंतवाडी माजगाव येथील जवान शुभम उदय सावंत (वय २२) शहीद झाला. त्यांचा मृतदेह पाच दिवसांनी आज, गुरुवारी त्यांच्या मूळगावी माजगाव येथे आणण्यात आला. यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते. त्यांच्या आई-वडिलांसह जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळींनी शुभमचे दर्शन घेतल्यानंतर गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘हुडहुड’ हे ताशी १७० ते १८० किलोमीटर वेगाने चक्रीवादळ आले होते. यात विशाखापट्टणममध्ये मोठी हानी झाली. या वादळात सापडलेल्या लोकांना मदत आणि बचाव कार्यासाठी नौदलाची पथके पाठविण्यात आली होती. त्यात माजगाव येथील शुभम सावंत यांच्यासह पाचजणांचे पथकही होते. ते विशाखापट्टणम येथे कार्यरत होते.रविवारी (११ आॅक्टोबर) सकाळच्या सुमारास नौदलाचे पथक कार्यरत असतानाच वादळामुळे पडलेली झाडे बाजूला करीत असतानाच एक झाड शुभम यांच्या अंगावर पडले. त्यात गंभीर जखमी झालेल्या शुभम यांना विशाखापट्टणम येथील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण त्याचदिवशी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. शुभमसोबतच्या अन्य युवकांचाही यावेळी मृत्यू झाला आहे. विशाखापट्टणम येथे वादळाने सर्व दूरध्वनी व भ्रमणध्वनी यंत्रणा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे शुभम यांच्या घरच्यांना रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास याबाबत माहिती देण्यात आली.अंत्यसंस्कारापूर्वी नौदलाच्या एका तुकडीने तसेच नंतर पोलिसांनी गोळीबाराच्या हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्ययात्रेत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विकास सावंत, डी. जी. सावंत, सरपंच आबा सावंत, सभापती प्रमोद सावंत, तहसीलदार सतीश कदम, पोलीस निरीक्षक रणजित देसाई, दाजी वारंग, रेश्मा सावंत, अशोक दळवी, श्वेता कोरगावकर, अ‍ॅड. शाम सावंत, चंद्रकांत कासार, भाऊ सावंत, उपसरपंच अमिदी मेस्त्री, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)वीरांसाठीची स्मशानभूमीशुभम सावंत यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी यापूर्वी सीमेवर शहीद झालेल्या दीपक सावंत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे ही जागा वीरांसाठी असल्याचे गावकरी सांगत होते.