शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यांत्रिकीकरणाचा निधी परतीच्या मार्गावर

By admin | Updated: March 23, 2016 00:42 IST

कृषी योजना थंड : दोन वर्षांचे ११५ लाख रुपये शिल्लक

रत्नागिरी : शेतकरी अवजारांच्या यांत्रिकीकरणासाठी कृषी विभागाकडून योजना राबवण्यात येते. मात्र, शेतकऱ्यांकडून अवजारांचा उठाव होत नसल्यामुळे या योजनेसाठी आलेला निधी अद्याप पडून आहे. आर्थिक वर्ष समाप्तीस अवघा आठवडा शिल्लक राहिल्याने हा निधी खर्ची पडणे मुश्किल आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत दोन वर्षाचा तब्बल ११५ लाखाचा निधी परत जाण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजना उपअभियान कृषी विभागातर्फे राबवण्यात येते. गतवर्षी (२०१४-१५) यांत्रिकीकरणासाठी ८१ लाख ९८ हजारांचा निधी कृषी विभागाकडे प्राप्त झाला होता. पॉवर टिलरसाठी ५६, तर ट्रॅक्टरसाठी ३ प्रस्ताव शेतकऱ्यांनी आॅनलाईन पाठवले होते. पैकी २० शेतकऱ्यांना पॉवरटिलरचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांकडूनच अवजारांचा उठाव होत नसल्यामुळे गतवर्षीचा २८ लाखाचा निधी शिल्लक राहिला आहे. यावर्षी (२०१५-१६) जिल्ह्यासाठी ८७ लाख ७८ हजारांचा निधी मंजूर झाला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून १९९ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. मात्र केवळ दोनच शेतकऱ्यांनी पैसे भरल्याने त्यांना अवजारांचे वितरण केले जाणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांकडून अवजारांचा उठाव झालेला नाही. त्यामुळे निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यांत्रिकीकरणांतर्गत पॉवरटिलर, ग्रासकटर, ट्रॅक्टर, रोटावेटरमशीन ५० ते ४० टक्के अनुदानावर वितरीत करण्यात येतात. शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्जाद्वारे मागणी केल्यानंतर कृषी विभागाकडून त्यास अवजारे खरेदीसाठी मान्यता दिली जाते. तद्नंतर शेतकऱ्यांना संबंधित अवजारांची शंभर टक्के रक्कम भरून एमईडीसीकडून अवजारे खरेदी करावी लागतात. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाते. असे असताना शेतकऱ्यांच्या प्रस्तावास कृषी विभागाने मान्यता देऊनही अवजारांचा उठाव केला जात नसल्यामुळे यांत्रिकीकरणाचा निधी शिल्लक राहिला आहे. गतवर्षीचा २८ लाख व यावर्षीचा ८७ लाख ७८ हजार मिळून ११५ लाखांचा निधी आर्थिक वर्ष समाप्तीमुळे परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)आॅनलाईन योजना : अवजारे खरेदी नसल्यानेच रक्कम शिल्लककृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी यांत्रिक अवजारे अनुदानावर वितरीत केली जातात. शेतकऱ्यांसाठी संबंधित योजना आॅनलाईन असून, कृषी विभागाकडून तात्काळ मान्यता दिली जाते. परंतु, शेतकऱ्यांकडून अवजारे खरेदी केली जात नसल्यामुळेच अनुदानाची रक्कम शिल्लक राहिली आहे. गतवर्षीबरोबर यावर्षीचाही निधी शिल्लक राहणार असल्याने मार्चनंतर संबंधित निधी परत पाठवावा लागणार आहे.- आरीफ शहा, जिल्हा कृषी अधीक्षक, रत्नागिरी.