शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर तालुक्यात वडिलांच्या स्मरणार्थ मोफत सार्वजनिक शौचालय

By admin | Updated: March 13, 2017 14:07 IST

स्वखर्चाने उभारणी,लोकार्पण सोहळा

वडिलांच्या स्मरणार्थ उभारलेमोफत सार्वजनिक शौचालयअसगोली : आपल्या आप्ताच्या स्मरणार्थ कोणी शाळेसाठी देणगी देतं, कुणी विद्यार्थ्यांना दत्तक घेतं, कुणी एखादं सभागृह बनवतं. पण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील नूरमहम्मद अब्बास बोट यांनी आपले वडील स्व. अब्बास हाजी इब्राहीम बोट यांच्या स्मरणार्थ चक्क जनतेसाठी स्वखर्चाने मोफत सुलभ शौचालयाची उभारणी करून नवा आदर्श उभा केला आहे. या शौचालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला.गुहागर तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून शृंगारतळीकडे पाहिले जाते. मात्र येथे शौचालयासाठी कोठेच जागा मिळत नसल्याने गैरसोय होत होती. ही समस्या दूर करण्यासाठी पाटपन्हाळेचे उपसरपंच संजय पवार यांनी अनेकांकडे जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही.दरम्यान नूरमहम्मद अब्बास बोट यांनी वेळंब फाटा येथे असलेल्या स्वत:च्या जागेत नदीवरील पुलाच्या बाजूला महिला व पुुरुषांसाठी स्वतंत्र विभाग असलेल्या सुलभ शौचालयाची उभारणी केली आहे. याचा लोकार्पण सोहळा पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच सविता भेकरे व सुचिता वेल्हाळ यांच्याहस्ते करण्यात आला.या कार्यक्रमावेळी उपसरपंच संजय पवार, ग्रामपंचायत सदस्य सृष्टी चव्हाण, दिनेश चव्हाण, पोलीस पाटील सत्यप्रकाश चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती जाधव, ग्रामविकास अधिकारी आर. जी. बेंडल, यासीन साटरे, जावेद केळकर उपस्थित होते. (वार्ताहर)