चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातर्फे पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांसाठी मोफत महाशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, अल्सर, प्रोस्टेट ग्रंथी, मूळव्याध, मुतखडे, चरबीच्या गाठी, थायरॉईड, महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, नाकाचे हाड वाढणे, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स, मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. या शस्त्रक्रिया जुलै व ऑगस्ट महिन्यात करण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित रूग्णांनी दि. ८ ते २० जुलैपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर शस्त्रक्रियांची तारीख निश्चित केली जाणार आहे.
या नोंदणीसाठी सचिन धुमाळ, संकेत जांभळे, संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधावा. दरम्यान, उपचारासाठी दाखल करताना रुग्णांची कोविड तपासणी आवश्यक आहे.