शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

चाळीस हजार खर्ची; पण, साहित्यच नाही!

By admin | Updated: April 11, 2017 00:32 IST

अधिकाऱ्यांनी हात झटकले; जि.प. महिला, बाल कल्याण समिती सभापतींच्या निवासातील प्रकार

रत्नागिरी : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापतींच्या निवासस्थानातील सामान खरेदीसाठी ४० हजार रुपये खर्ची पडले असले तरी ते सामान मात्र अजूनही सभापती निवासस्थानात आलेच नसल्याची बाब पुढे आली आहे. महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र बांधकाम विभागाकडे बोट दाखवत आपली जबाबदारी झटकली़ महिला व बालकल्याण विभागात गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे. या विभागाने जिल्हा परिषद सेसफंडातून २० लाख रुपयांचे निकृष्ट दर्जाचे पल्वरायझर खरेदी करून लाभार्थ्यांच्या माथी मारले होते. तत्कालीन सभापती दुर्वा तावडे यांच्या काळात होम लाईट खरेदी केले गेले. लाखो रुपये खर्चून खरेदी केलेले होम लाईट निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघडकीस आले. लाखो रुपयांच्या सायकल खरेदी करण्यात आल्या. मात्र, पुरवठादाराने काही सायकल गंजलेल्या अवस्थेतच दिल्या. याच सायकल पुरवठादाराने पाच वर्षांपूर्वी रत्नागिरी पंचायत समितीला कमी दर्जाच्या सायकलींचा पुरवठा केला होता. त्यावेळी महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी हात वर केले होते. महिला व बालकल्याण विभागाने गेल्या काही वर्षांत केलेली वस्तू, सामान खरेदी वादग्रस्त ठरली असल्याने महिला व बालकल्याण समितीच्या नूतन सभापती ऋतुजा खांडेकर यांच्यासाठी कामाचे आव्हानच आहे. तत्कालीन सभापती तावडे यांच्या कालावधीतील आणखी एका खरेदी प्रकरणाची जोरदार चर्चा परिषद भवनात सुरू आहे. या सभापतींच्या टीआरपी येथील निवासस्थानासाठी बेड, खुर्च्या, पडदे व इतर सामान खरेदी करण्यासाठी ४० हजार रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. मात्र, हे सामान सभापती निवासस्थानात नाही, अशी चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.याबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या खर्चाबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे सांगत त्यांनी बांधकाम विभागाकडे बोट दाखविले आहे. सामान खरेदी झाले की नुसतीच बिले सादर झाली, सामान खरेदी झाले तर ते सभापती निवासस्थानात का नाही, असे प्रश्न आता जिल्हा परिषदेत चर्चिले जात आहेत. (शहर वार्ताहर)