शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग केवळ २० टक्केच, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

By शोभना कांबळे | Updated: September 6, 2023 19:25 IST

गावागावांमध्ये कॅम्प घेणार 

रत्नागिरी : मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग हवा तेवढा नाही. ८० ते ८५ टक्के मतदारांचे नाव मतदार यादीतच नाही, ही सशक्त लोकशाही होण्यासाठी चिंताजनक बाब आहे, असे मत रत्नागिरी दाैऱ्यावर आलेले राज्याचे अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले. तसेच लोकशाही प्रबळ होण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांची संख्या वाढणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. आज, बुधवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण २०२४ कार्यक्रमाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे रत्नागिरीत आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्याच्या आढावा घेतला. या कार्यक्रमाची तसेच मतदार जनजागृती याविषयी निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, परिविक्षाधीन अधिकारी डाॅ. जस्मीन उपस्थित होते. मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही उदासीनता असल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. हे मतदार वाढण्यासाठी केवळ आयोगाचे नव्हे तर सर्व राजकीय पक्षांकडून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.गावागावांमध्ये कॅम्प घेणार मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण २०२४ कार्यक्रमाविषयी माहिती देताना देशपांडे म्हणाले की, हे निवडणूक वर्ष आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा तयार असाव्यात यासाठी महाराष्ट्रभर जिल्हा निहाय आढावा आयोगाकडून घेतला जात आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्याचा हेतू या याद्या निर्दोष करणे तसेच नवमतदारांना समाविष्ट करणे हा आहे. लोकशाही प्रबळ होण्यासाठी मतदान प्रक्रियेत अधिकाधीक मतदारांची संख्या वाढणे गरजेचे आहे. सध्या या प्रक्रियेत १८ -१९ वयोगटातील नवमतदारांची संख्या अतिशय अल्प दिसते. मतदार वाढीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असून शाळा - महाविद्यालये तसेच गावागावांमध्ये कॅम्प घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकVotingमतदान