रत्नागिरी : इंटरनॅशनल पॅकेजिंग प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (ओवेन्स कॉर्निंग ग्रुप ऑफ कंपनीज) यांच्यातर्फे चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्तांसाठी टारपोलिन शिट्सचे वाटप करण्यात आले.
या कंपनीतर्फे चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्तांना आतापर्यंत एकूण १०५० शिट्सचे वाटप करण्यात आले आहे. महाडमधील सावराट, करमाल, कदमकोंड, सांडोशी, छत्री निजामपूर आणि चिपळूणमधील उक्ताड, पेठमाप, शंकरवाडी, मुरादपूर, पेढे, दळवटणे, काविळतळी, मार्कंडी या विभागात वाटप करण्यात आले. सुमारे सात ते आठ लाखांच्या वस्तूंचे वाटप या कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल ओवेन्स कॉर्निंग ग्रुप ऑफ कंपनीजला धन्यवान दिले आहेत.
फोटो मजकूर
ओवेन्स कॉर्निंग ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यातर्फे चिपळूण आणि महाड येथे जाऊन तेथील पूरग्रस्तांसाठी टारपोलिन शिट्सचे वाटप करण्यात आले.