शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चिपळुणात हिवतापाचे ५ रुग्ण आढळले

By admin | Updated: November 14, 2014 00:20 IST

चिपळूण : साथीचे कोणतेही आजार पसरु नयेत,

चिपळूण : साथीचे कोणतेही आजार पसरु नयेत, यासाठी आरोग्य विभागातर्फे जानेवारी ते सप्टेंबरअखेर हिवताप रक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ३५ हजार ३४५ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. यामध्ये केवळ ५ हिवतापाचे रुग्ण आढळले. त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यात आले. सध्या डेंग्यूसदृश साथ असल्याने या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे. आरोग्य विभागातर्फे जानेवारी ते सप्टेंबरअखेर ताप येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण ३५ हजार ३४५ रुग्णांच्या रक्तांचे नमुने तपासणीसाठी रत्नागिरी येथे पाठविण्यात आले. त्यापैकी केवळ ५ रुग्ण हिवतापाचे आढळले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रामपूर येथे ४ हजार १५१ रुग्णांचे रक्त नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये १ रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह निघाला. खरवते येथील ३ हजार ८८६ रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पैकी १ रुग्ण हिवतापाचा निघाला. कापरे आरोग्य केंद्राअंतर्गत १ हजार ९३१ रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तेथे एकही रुग्ण आढळला नाही. दादर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५ हजार ८ रुग्णांचे रक्तांचे नमुने तपासण्यात आले. तेथे १ रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रात २ हजार २६ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. येथे एकही रुग्ण मलेरियासदृश आढळला नाही. कामथे कुटीर रुग्णालयाअंतर्गत ३ हजार ६८९ रुग्णांचे रक्तांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. या ठिकाणीही हिवतापाचा रुग्ण आढळून आला नाही. चिपळूण नगर परिषद दवाखानाअंतर्गत २ हजार ७१२ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. यामध्ये १ पॉझिटिव्ह रुग्ण निघाला. शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत ३ हजार २४३ रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. येथे एकही हिवतापाचा रुग्ण आढळला नाही. सावर्डे प्राथमिक केंद्राअंतर्गत ४ हजार ५३० रुग्णांची रक्ततपासणी करण्यात आली. येथे २ रुग्ण हिवताप पॉझिटिव्ह आढळले. फुरुस प्राथमिक केंद्राअंतर्गत १ हजार ६६५ रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले. येथे एकही रुग्ण हिवतापाचा आढळला नाही. वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २ हजार ५०४ रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. तेथेही हिवतापाचा रुग्ण या कालावधीत आढळला नाही. जानेवारी ते डिसेंबर अखेर ३५ हजार ३४५ रुग्णांचे रक्त तपासणी करण्यात आली. (प्रतिनिधी)