शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाटगाव नगरीत प्रथमच रंगला चिखलणीचा थरार, नांगरासह उधळली बैलजोडी चौखूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:27 IST

हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत शिट्टीचा इशारा होताच नांगरासह बैलजोडी चौखूर उधळत होती! देवरूखवासियांना पाटगाव नगरीत प्रथमच सामुदायिक चिखलणी व नांगरणी स्पर्धा पाहायला मिळाली.

ठळक मुद्देपाटगाव नगरीत प्रथमच रंगला चिखलणीचा थरार दिलीप शिर्के यांच्या बैलजोडीने केले अंतर पार

देवरूख : हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत शिट्टीचा इशारा होताच नांगरासह बैलजोडी चौखूर उधळत होती! देवरूखवासियांना पाटगाव नगरीत प्रथमच सामुदायिक चिखलणी व नांगरणी स्पर्धा पाहायला मिळाली.जय सांबा, पाटगाव ग्रामस्थ मंडळ व भारतीय जनता पार्टी, देवरूख यांच्यावतीने पाटगाव येथे नांगरणी चिखलणी स्पर्धा पार पडली. घाटी बैलजोडी प्रकारात देवळे येथील दिलीप शिर्के यांच्या बैलजोडीने १८ सेकंद ९७ पॉर्इंटमध्ये विहीत अंतर पार करत प्रथम क्रमांकाचा मानकरी होण्याचा मान पटकावला, तसेच विहार कदम (आरवली) द्वितीय व पंकज दळवी (शिंदेआंबेरी) यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांक पटकावला.गावठी बैलजोडी प्रकारात करंबेळे येथील सचिन धावडे यांच्या बैलजोडीने १९ सेकंद १५ पॉर्इंटमध्ये विहीत अंतर पार करत प्रथम क्रमांकाची बाजी मारली आहे. शंकर डोंगरे (साडवली) द्वितीय क्रमांक, तर राजाराम चव्हाण (कडवई) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

गावठी बैलजोडीमध्ये प्रकारामध्ये साडवलीचे शंकर डोंगरे व करंबेळेचे सचिन धावडे यांच्या बैलजोडीने १९.१५ सेकंदात अंतर कापले. दोन्ही जोड्या एकाच वेळेत आल्यामुळे प्रथम क्रमांकासाठी टॉस उडविण्यात आला. तो करंबेळे यांनी जिंकला.

घाटीमध्ये आरवली येथील विहार कदम व शिंदे आंबेरी येथील पंकज दळवी यांच्या बैलजोडीनेही समान वेळेत अंतर पार केल्याने व्दितीय क्रमांकासाठी टॉस करण्यात आला. यामध्ये विहार कदम हे जिंकले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायत