शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीसाठी नवे मार्ग शोधा

By admin | Updated: March 17, 2016 00:05 IST

एन. डी. पाटील : पाटबंधारे विभागाच्या जलजागृती सप्ताहास प्रारंभ; जलकीर्तनाने जागृती

कोल्हापूर : आपण पाणी निर्माण करू शकत नाही. भूजल साठा कधीच संपणार नाही, या भ्रमातून बाहेर पडायला हवे. पाण्याचे पुनर्भरण करता येत नाही, या मर्यादा ओळखून पाणी बचतीचे नवे मार्ग शोधून लोकांना जागे करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.पाण्याबाबत जागृती व साक्षरता निर्माण करण्यासाठी पाटबंधारे विभागातर्फे आयोजित जलजागृती सप्ताहाचा प्रारंभ बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झाला. याप्रसंगी ते बोलत होते. पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे प्रमुख उपस्थित होते.प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, पाणी बचतीसाठी काय उपाय योजले पाहिजेत याची चर्चा करत न बसता आजपासून ठोस पावले उचलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ‘पाणी’ या विषयाकडे आपण बेजबाबदार पद्धतीने पाहत आलो आहोत. ९० टक्के शेतकरी पाणी वापराचे निर्बंध पाळत नाहीत. सरकारने ठिबक सिंचनची सक्ती करून पाणी वापराबाबत कडक भूमिका घ्यायला हवी. नागरिकांनीही भ्रमात न राहता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहावे. सध्या पाणीबाणीचा काळ असून पाण्याचा वापर कमी करता येणारी उपकरणे घरी बसवून काटकसर करावी. या पाणी संकटातून सुटका करत शेतकऱ्यांनी देशासमोर एक आदर्श ठेवायला हवा. शासनाने पाण्याचा पुर्नवापर करणारी यंत्रणा असेल तरच कारखान्यांना पाणी परवाने द्यावेत. साखर कारखान्यांनीही मळी नदीच्या पात्रात न सोडता सहकार्य करावे. पाणी बचतीसाठी शासन पातळीवरून जागृती होत आहे. ही उमेदीची बाब आहे. जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून सिंचन शेतीचा प्रयोग राबवायला हवा. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील तलाव कोरडे पडले आहेत. लोकसहभागातून त्यातील गाळ उपशाचे काम केले गेले तर पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठवता येईल. किमान पाणीसाठ्याच्या योजनांमध्ये आडकाठी न करता सहकार्य करावे.उपवन संरक्षक नाईकडे म्हणाले, जलजागृती फक्त एक दिवस न राहता ३६५ दिवस नागरिकांनी सहभागी व्हायला हवे. जलवैभव जतन करून पुढच्या पिढीकडे देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण अभ्यासक गायकवाड म्हणाले, स्वत:पासून पाणी बचत बदलास सुरुवात करायला हवी. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवर पाणी बचतीचे संस्कार देण्याची गरज आहे. पाण्याचा एकही थेंब वाया घालवणार नाही, असा संकल्प प्रत्येकाने करायला हवा. जलकीर्तनकार विश्वनाथ डवरी यांचे कीर्तन झाले. सिद्धार्थ बद्दी यांनी लोकगीत सादर केले. कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अधीक्षक अभियंता एम. एस. जिवणे, एस. सी. कोष्टी, कार्यकारी अभियंता शि. मा. चव्हाण, वि. पा. पाटील, जे. जे. बारदेसकर, अधिकारी, कर्मचारी, आदी उपस्थित होते. अशोक भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)जलदिंडीत सोळा नद्यांचे पाणीसकाळी टाळ-मृदुंगाच्या गजरातील भजन, हलगीच्या कडकडाटात सिंचन भवन-जिल्हाधिकारी कार्यालय- असेंब्ली रोड- व्हीनस कॉर्नर- दसरा चौक या मार्गावरून जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीत पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. महिला अधिकारी, कर्मचारी जिल्ह्यातील १६ नद्यांच्या पाण्याचे कलश डोक्यावर घेऊन या जलदिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या.