शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे अर्थसहाय्य

By admin | Updated: December 5, 2014 23:18 IST

५० टक्के अनुदान योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपये असून, प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते

रत्नागिरी : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत ५० टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध उमेदवारांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. पात्र उमेदवारांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.५० टक्के अनुदान योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपये असून, प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. उर्वरित रक्कम बँकेमार्फत बँक व्याजदराने उपलब्ध करुन देण्यात येते. कर्जाची परतफेड ३ ते ५ वर्षामध्ये करावयाची आहे. बीज भांडवली योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा ५० हजारांपासून ५ लाखांपर्यंत आहे. प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के व्याजदराने देण्यात येते. या रकमेमध्ये महामंडळाचे अनुदान १० हजार रुपये आहे. बँकेचे कर्ज ७५ टक्के देण्यात येते. या कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येते. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या हप्त्यानुसार ३ ते ५ वर्षात करावयाची आहे. अर्जदाराला ५ टक्के स्वत:चा सहभाग भरावा लागतो. अर्ज करण्यासाठी अर्जदार अनुसूचित जाती, नवबौध्द संवर्गातील असावा. त्याचे वय १८ ते ५० वयोगटातील असावे. वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी एक लाख रुपयांच्या आत असावे. अर्जासोबत जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुरुप इतर आवश्यक दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल इत्यादी कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. महामंडळामार्फत फोटोग्राफी, सायकल दुकान, पान शॉप, जनरल स्टोअर्स, किराणा स्टोअर्स, डेअरी, मंडप डेकोरेशन, इलेक्ट्रीकल शॉप, ब्युटी पार्लर, शेळ्या, मेंढ्या पालन, कुक्कुटपालन, हॉटेल ढाबा, फळे, भाजी विक्री, कापड विक्री, रेडीमेड गारमेंट, आईस्क्रीम पार्लर, कोल्ड्रिंक्स शॉप, बैलजोडी-बैलगाडी, भांडीविक्री, बुरूडकाम, नारळविक्री, विणकाम, लाऊडस्पिकर, मटण शॉप, कटलरी, पापड लोणचे बनविणे, मिरची कांडप मशिन, पीठ गिरण, टी. व्ही. रिपेरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आयटम रिपेरिंग आॅटो रिक्षा, मालवाहतूक टेम्पो, टुरिस्ट वाहन खरेदी, दुग्ध व्यवसाय आदी व्यवसायांना अर्थपुरवठा केला जातो. तसेच स्थानिक पातळीवर चालणाऱ्या व्यवसायास अर्थपुरवठा केला जातो. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)