२. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने आणि गणेशोत्सवाच्या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेकडून सर्वतोपरी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचे आणि नगर परिषदेचे प्राथमिक शिक्षकांच्या ड्युट्या कोविड केंद्रांवर, तसेच तपासणी नाक्यावर लावण्यात आल्या आहेत. लसीकरण केंद्रांवरही नगर परिषदेचे शिक्षक आरोग्य विभागाच्या बरोबरीने काम करीत आहेत.
३. चिपळूण तालुक्यातील कापरे आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच दिवशी ६००जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्याचा विक्रम केला. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गाव पोसरे, गोंधले, हनुमानगाव, कालुस्ते, मालडोली, गांग्रई अशा सहा ठिकाणी एकाच वेळी लसीकरणाचे नियोजन करून ते यशस्वी करण्यात आले. कोरोनाचे संकट लवकरात लवकर नष्ट व्हावे, यासाठी युद्धपातळीवर लसीकरणाचे काम सुरू आहे.