रत्नागिरी : तुटलेली युती आणि फुटलेली आघाडी यामुळे यावेळी निवडणूक रिंगणात अधिक उमेदवार असणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यानुसार मुख्य चार पक्षांसह अनेक छोट्या-छोट्या पक्षांनी येणेप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील काही उमेदवार पुढच्या दोन दिवसात अर्ज मागेही घेतील. तरीही दोन्ही जिल्ह्यात बहुरंगी निवडणुका होणार, हे स्पष्ट आहे. या सगळ्या राजकारणात पक्षांतरचे वारे कोकणातही पोहोचले आहेत. सर्वसामान्य लोकच नाही तर बरोबरच्या कार्यकर्त्यांना कळायच्याही आधी खांद्यावरचे झेंडे बदलण्याचे प्रमाण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दिसू लागले आहे.शिवसेना-भाजपची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी यातील बेबनाव महाराष्ट्रात अनेक बदल करून गेला आहे. कोकणही त्याला अपवाद नाही. उदय सामंत यांचा शिवसेनाप्रवेश, राजन तेली यांचा भाजपप्रवेश हे जास्त चर्चेचे विषय झाले आहेत.युती आणि आघाडी तुटल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला रत्नागिरीत उमेदवार आयात करावा लागला, भाजपला रत्नागिरी आणि गुहागरवगळता इतर मतदार संघात अगदीच नवख्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. राष्ट्रवादीवर रत्नागिरीत आयत्यावेळी उमेदवार शोधण्याची वेळ आली. काँग्रेसला राजापूर, रत्नागिरीवगळता इतर ठिकाणी तडजोडीच कराव्या लागल्या.सिंधुदुर्गातही फारसे वेगळे चित्र नाही. भाजपला सावंतवाडीत राजन तेलींना आयात करावे लागले. राष्ट्रवादीने आयत्यावेळी सुरेश दळवींना उमेदवारी दिली.दोन्ही जिल्ह्यात आतापर्यंत बंडखोरी झालेली दोनच नावे पुढे आली आहेत. काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनी कणकवलीतून तर राष्ट्रवादीच्या किशोर देसाई यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चिपळुणातही काँग्रेसच्या तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्थात अर्ज माघारीच्या दिवसानंतरच नेमकी लढत कोणामध्ये होणार, हे स्पष्ट होईल. मात्र यावेळी दोन्ही जिल्ह्यात प्रथमच बहुरंगी लढती होणार आहेत. (प्रतिनिधी)रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक रिंगणात उतरलेले पक्षीय आणि अपक्ष तसेच डमी उमेदवारराजापूरप्रमिला भारतीहिंदू महासभाआनंद कांबळेबसपराजन साळवीशिवसेनाराजेंद्र देसाईकाँग्रेसराजेश गुरवअपक्षसुरेश शेवाळेअपक्षअजित यशवंतरावराष्ट्रवादीसंजय यादवरावभाजपरूपेश गांगणभाजपसंदीप कांबळेरिपाइंगणपत जाधवअपक्षरत्नागिरीबाळ मानेभाजपबाबा परूळेकरभाजपमंदार परकारहिंदू महासभासुनील सुर्वेअपक्षदिनेश पवारबसपाउदय सामंतशिवसेनासंदीप गावडेअपक्षनंदकुमार मोहितेबविआरमेश कीरकाँग्रेसबशीर मुर्तुझाराष्ट्रवादीउदय सावंतअपक्षमनिष तळेकरअपक्षप्रवीण जाधवअपक्षगुहागरभास्कर जाधवराष्ट्रवादीडॉ. विनय नातूभाजपप्रशांत शिरगावकरभाजपसंदीप सावंतकाँग्रेससुरेश गमरेबसपाविजय असगोलकरकाँग्रेसविजयकुमार भोसलेशिवसेनादापोलीसूर्यकांत दळवीशिवसेनाकेदार साठेभाजपशशिकांत धाडवेस्वाभीमान ब.संघसुनील भांबीडअपक्षप्रमोद मेहेंदळेअपक्षअजित तांबेरिपाइंआदम चौगुलेबहुजन मु. मोर्चावैभव खेडेकरमनसेसंजय कदमराष्ट्रवादीअॅड. सुजित झिमणकाँग्रेसकिशोर देसाईअपक्षज्ञानदेव खांबेबसपासुनील खेडेकरबसपप्रवीण कोलगेशेकापप्रदीप गंगावणेअपक्षचिपळूणसदानंद चव्हाणशिवसेनासुशांत जाधवरिपाइंप्रेमदास गमरेबसपाअनंत जाधवरिपाइंंलियाकत शाहअपक्षअशोक जाधवकाँग्रेसरश्मी कदमकाँग्रेसमाधव गवळीभाजपयशवंत तांबेरिपाइंगोपीनाथ झोपलेअपक्षउमेश पवारबहुजन मु. पार्टीसंतोष गुरवअपक्षकणकवलीप्रमोद जठारभाजपनितेश राणेकॉँग्रेससुभाष मयेकरशिवसेनाअतुल रावराणेराष्ट्रवादीतुळशीराम रावराणेशेकापचंद्रकांत जाधवबसपासंजय पाताडेभाजपविजय कृ. सावंतअपक्षविजय श्री. सावंतअपक्षसुनील सरवणकरअपक्षसुजित तावडेअपक्षअभिनंदन मालंडकरअपक्षविश्वनाथ पडेलकरअपक्षकुडाळरवींद्र कसालकरबसपावैभव नाईकशिवसेनाकिशोर शिरोडकरअपक्षस्नेहा केरकरअपक्षपुष्पसेन सावंतराष्ट्रवादीलवू वारंगअपक्षनारायण राणेकॉँग्रेसविष्णू मोंडकरभाजपदेऊ तांडेलअपक्षसावंतवाडीकिशोर लोंढेअपक्षराजन तेलीभाजपवसंत केसरकरअपक्षसुरेश दळवीराष्ट्रवादीपल्लवी केसरकरशिवसेनापरशुराम उपरकरमनसेसंजय देसाईअपक्षअतुल काळसेकरभाजपचंद्रकांत गावडेकॉँग्रेस उदय पास्तेअपक्षकुस्त्यान मोंतेरोअपक्ष विष्णू जाधवभारीप ब. महासंघवासुदेव जाधवबहुजन मु. पार्टी दीपक केसरकरशिवसेनाअजिंक्य गावडेअपक्षवासुदेव जाधवअपक्ष
पक्षांतराचे ढोल कोकणातही वाजले
By admin | Updated: September 28, 2014 23:58 IST