शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

बारशाला जाताना पित्याचा मृत्यू

By admin | Updated: May 14, 2016 00:27 IST

दोन्ही चालक गंभीर : धामणी येथे कारची रिक्षाला धडक

बारशाला जाताना पित्याचा मृत्यूदोन्ही चालक गंभीर : धामणी येथे कारची रिक्षाला धडकआरवली : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे कार आणि रिक्षा यांच्या अपघातात विनोद मारुती गमरे (वय ३५,मूळ गाव, धामापूर-बौद्धवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला. विनोद आपल्या मुलीच्या बारशासाठी मुंबईहून गावी आला होता. रेल्वे स्थानकाकडून घराकडे जाताना हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही गंभीर चालकांना डेरवणमधील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये राहणारे विनोद गमरे हे आपल्या मुलीच्या बारशासाठी शुक्रवारी पहाटे रेल्वेने संगमेश्वर रोड, रेल्वे स्थानकावर उतरले. तेथून ते रिक्षाने आपल्या गावी धामापूर-बौद्धवाडी येथे जाण्यासाठी निघाले. ती रिक्षा त्यांच्या गावापर्यंत जाणार नव्हती. त्यामुळे त्या रिक्षाचालकाने वाटेत दुसऱ्या एका रिक्षाचे (एमएच 0८ के १४३९) चालक लीलाधर पंडित (चिखली, ता. संगमेश्वर) यांना थांबविले.पंडित धामणीकडेच जात असल्याने गमरे त्यांच्या रिक्षामध्ये बसले आणि पुढे एक होंडा कार (एचआर २0 क्यू 00९0) त्यांच्या रिक्षाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात रिक्षा पूर्णपणे चेपली गेली. त्यामुळे रिक्षातील गमरे जागीच ठार झाले. रिक्षाचालक पंडित आणि कारचालक चमनलाल राजकुमार मित्तल (दिल्ली) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लगेचच डेरवण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कारमध्ये अन्य दोघेजण होते. ते मुंबईहून गोव्याकडे जात होते. मात्र, त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)काळ आणि वेळ आलीच होती...गमरे यांच्या मुलीचे १९ मे रोजी बारसे होते. त्यासाठी ते आणि त्यांचे काही नातेवाईक मुंबईहून निघाले. इतर नातेवाईक दुसऱ्या रेल्वेने आले. गमरे त्यांच्या आधी निघाले असल्याने ते लवकरच्या रेल्वेमध्ये बसले. रेल्वेतून उतरल्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी ते रिक्षामध्ये बसले. मात्र, ती रिक्षा त्यांच्या गावाकडे जाणारी नव्हती. त्यामुळे त्या रिक्षाचालकाने वाटेत धामणीकडे जाणाऱ्या रिक्षावाल्याला थांबविले आणि गमरे त्या रिक्षात जाऊन बसले. पुढे केवळ २00 मीटर अंतर गेल्यावरच हा अपघात झाला. गमरे यांचा काळ आणि वेळ एकत्र आल्याची प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटत होती.