शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! विजेच्या धक्क्याने बापलेक ठार; रत्नागिरीतील पुजारी कुटुंबावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 23:02 IST

Electric shock death Ratnagiri News: नाणारमधील चिवारवाडी येथील रहिवासी असलेले पुजारी नाणार ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून काम करतात.

राजापूर : खेकडे पकडण्यासाठी वहाळावर गेलेले बापलेक विजेची तार पाण्यात पडल्याने शॉक लागून जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील नाणार येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. दिवाकर पुजारी (४२) आणि त्यांचा १0 वर्षांचा मुलगा अथर्व यांचा यात दुर्दैवी अंत झाला.

नाणारमधील चिवारवाडी येथील रहिवासी असलेले पुजारी नाणार ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून काम करतात. शुक्रवारी सायंकाळी ते आपल्या मुलगा अथर्व आणि गावातील अन्य दोन मुलांसह खेकडे पकडण्यासाठी गिरमादेवी वहाळ येथे गेले होते. खेकडे पकडण्यासाठी दिवाकर आणि अथर्व पाण्याच्या प्रवाहात भांडी लावत होते. त्याचवेळी वहाळावरून जाणाºया ११ केव्ही क्षमतेच्या विजेच्या तारेचा कंडक्टर तुटला आणि वीज प्रवाहीत असलेली तार पाण्यात पडली. त्यामुळे दिवाकर आणि त्यांचा मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांच्यासोबतच्या मुलांनी तत्काळ या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यांनी पोलीस स्थानक तसेच तहसील कार्यालयाला ही माहिती कळवली. महावितरण कंपनीचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी रवाना झाले आहेत.

टॅग्स :electricityवीज