शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या औषधोपचाराच्या पैशांसाठी उपोषण

By admin | Updated: August 14, 2016 00:30 IST

महेंद्र मिश्रा : हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याकडून मारहाण; पालकांनी पैसे देण्याची दिली होती कबुली

दापोली : दापोली शहरातील काळकाई कोंड येथील रहिवासी महेंद्र मिश्रा हे घरोघरी फिरुन अगरबत्तीचा व्यवसाय करतात. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय हालाखीची आहे. त्यांचा मुलगा आकाश याला ए. जी. हायस्कूलमध्ये अन्य एका विद्यार्थ्यामुळे मार्च २०१६ मध्ये गंभीर दुखापत झाली होती. यावेळी त्याच्या औषधोपचारांचा खर्च संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी देण्याचे कबूल केले होते. मात्र, कबूल केल्याप्रमाणे औषधोपचारांसाठी मदत न देण्यात आल्याच्या निषेधार्थ मिश्रा कुटुंबाने १५ आॅगस्ट रोजी ए. जी. हायस्कूलसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.सागर सावंतदेसाई या मुलाने आपल्याच वर्गातील आकाश मिश्रा याची मान आवळून त्याला मारहाण केली होती. हा प्रकार मार्च महिन्यात घडला होता. त्यामुळे आकाशला तातडीने मिरज येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. येथे उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर १७ मार्च २०१६ रोजी दापोली पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक डॅनियल बेन, पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शेलार, ए. जी. हायस्कूलचे अधिकारी यांची बैठक झाली होती. या बैठकीत आपल्या मुलाच्या औषधोपचारांसाठी झालेला २ लाख ५० हजार रुपये व त्यानंतर होणारा सर्व खर्च शाळा व सावंतदेसाई यांनी करू, असे कबूल केले होते. मात्र, प्रत्यक्षात ही रक्कम मिश्रा कुटुंबियांना दिलेली नाही. त्यामुळे मिश्रा यांना आपल्या पत्नीच्या स्त्रीधनासह अन्य दागिने गहाण ठेवून मुलाच्या औषधोपचारांचा खर्च भागवावा लागला होता. मात्र, तरीही त्याची प्रकृती स्थिर होत नसल्याने मिश्रा कुटुंबिय हताश झाले आहेत. आता त्यांची घरात उपासमार होत असून, आता या कुटुंबाला दोनवेळच्या जेवणाचीदेखील भ्रांत पडल्याची विदारक स्थिती आहे. मिश्रा यांनी उपोषणाचे पत्र ए. जी. हायस्कूल त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला दिले होते. त्यानंतर पोलिसांनी ८ आॅगस्ट रोजी मिश्रा यांच्या घरी जात त्यांना दरडावले होते. याचा धसका आकाशने घेतला आणि त्या संध्याकाळपासून त्याला फिट येणे सुरू झाले. त्याला मंगळवारी पहाटे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथून शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शाळा, सावंतदेसाई आणि पोलीस प्रशासनाकडून योग्य न्याय मिळत नसल्यामुळे आपण उपोषण करत असल्याचे मिश्रा यांनी निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे आपल्या उपोषणाची आणि जीविताची सर्वस्वी जबाबदारी सावंतदेसाई कुटुंबिय व पोलीस प्रशासनावर राहणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)