शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

आरोग्य उपकेंद्रांना भाड्याच्या जागेची बाधा

By admin | Updated: October 21, 2015 23:34 IST

राजापूर तालुका : सोयीसुविधा अद्याप अपुऱ्याच

राजापूर : स्वमालकीची इमारत नसल्याने तालुक्यातील १८ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे कामकाज भाड्याच्या जागेत सुरू आहे. हे कामकाज स्वत:च्या जागेतून केव्हा हाकणार, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. राजापूर तालुक्यात सध्या आरोग्य केंद्रांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोग्य उपकेंद्रांचीही तशीच अवस्था आहे. अनेक उपकेंद्रांना स्वत:च्या इमारती नसल्याने अनेक समस्यांचा सामना करतच रुग्णांना सेवा द्यावी लागत आहे. आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींचा प्रश्न आजवर अनेकवेळा शासनदरबारी मांडण्यात आला आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.यामध्ये ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ओणी, चुनाकोळवण, खरवते, करक, कारवलीअंतर्गत करक, परूळे, तळवडे, फुफेरेअंतर्गत आंगले, दोनिवडे, तुळसवडे, जवळेथरअंतगत काजिर्डा, कुंभवडेअंतर्गत सागवे जैतापूरअंतर्गत साखर, पडवे, डोंगर, सोलगावअंतर्गत देवाचेगोठणे धारतळेअंतर्गत कोंडसर बुद्रुक, राजवाडी, वाडापेठ या गावांचा समावेश आहे. या सर्व उपकेंद्रांचा कारभार भाड्याच्या जागेतून चालतो, अशा इमारती बांधण्यासाठी दहा गुंठे जागा उपलब्ध असावी लागते. तथापि जागेचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळेच ही अडचण निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी जागाच उपलब्ध होत नसल्याने आणि लोकप्रतिनिधी याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने हा प्रश्न भिजत पडला आहे. शासनाने लवकरात लवकर उपकेंद्रांच्या स्वमालकीबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)आरोग्य उपकेंद्रांना भाड्याच्या जागेची बाधाराजापूर तालुका : सोयीसुविधा अद्याप अपुऱ्याचराजापूर : स्वमालकीची इमारत नसल्याने तालुक्यातील १८ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे कामकाज भाड्याच्या जागेत सुरू आहे. हे कामकाज स्वत:च्या जागेतून केव्हा हाकणार, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. राजापूर तालुक्यात सध्या आरोग्य केंद्रांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोग्य उपकेंद्रांचीही तशीच अवस्था आहे. अनेक उपकेंद्रांना स्वत:च्या इमारती नसल्याने अनेक समस्यांचा सामना करतच रुग्णांना सेवा द्यावी लागत आहे. आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींचा प्रश्न आजवर अनेकवेळा शासनदरबारी मांडण्यात आला आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.यामध्ये ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ओणी, चुनाकोळवण, खरवते, करक, कारवलीअंतर्गत करक, परूळे, तळवडे, फुफेरेअंतर्गत आंगले, दोनिवडे, तुळसवडे, जवळेथरअंतगत काजिर्डा, कुंभवडेअंतर्गत सागवे जैतापूरअंतर्गत साखर, पडवे, डोंगर, सोलगावअंतर्गत देवाचेगोठणे धारतळेअंतर्गत कोंडसर बुद्रुक, राजवाडी, वाडापेठ या गावांचा समावेश आहे. या सर्व उपकेंद्रांचा कारभार भाड्याच्या जागेतून चालतो, अशा इमारती बांधण्यासाठी दहा गुंठे जागा उपलब्ध असावी लागते. तथापि जागेचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळेच ही अडचण निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी जागाच उपलब्ध होत नसल्याने आणि लोकप्रतिनिधी याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने हा प्रश्न भिजत पडला आहे. शासनाने लवकरात लवकर उपकेंद्रांच्या स्वमालकीबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)राजापुरातील १८ आरोग्य उपकेंद्र ही नजीकच्या अनेक गावांसाठी उपयुक्त आहेत. दरदिवशी हजारो रुग्ण याठिकाणी उपचार घेतात. मात्र, त्याठिकाणी अनेक समस्या असल्याने यापेक्षा खासगी रुग्णालयांचा आधार घेतलेला बरा, अशी इच्छा अनेक रुग्ण बोलून दाखवत आहेत.पुढाऱ्यांचे दुर्लक्षराजकीय नेते या आरोग्य उपकेंद्रांकडे फिरकतही नाहीत. या पुढाऱ्यांपैकी कुणी आजारी असले तर ते खासगी रुग्णालयाचा आधार घेतात. त्यामुळे त्यांना सामान्यांच्या वेदना काय कळणार? असा संतप्त सवाल केला जात आहे.