शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नमनामध्ये सहभाग न घेतल्याने कुटुंब वाळीत

By admin | Updated: September 9, 2014 23:45 IST

पोलिसात तक्रार : संगमेश्वर तालुक्यातील कसबा देवपाटवाडीतील प्रकार उघडकीस

रत्नागिरी : इंटरनेट तथा मोबाईलमुळे अवघे जग समीप आले आहे. वैज्ञानिक युगात जगत असतानादेखील केवळ क्षुल्लक कारणास्तव एखादे कुटुंब वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे. कसबा देवपाटवाडीतील संतोष चांदे या कुटुंबीयाला वाडीने गेली दीड वर्षे वाळीत टाकल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील तंटामुक्त समिती तसेच संगमेश्वर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार नोंदवूनसुध्दा न्याय न मिळाल्याने चांदे कुटुंबीय मानसिक दडपणाखाली वावरत असल्याचे दिसून येत आहे.संतोष चांदे (कसबा देवपाट) येथील रहिवासी आहेत. वाडीतील घरपट माणसाने नमनामध्ये सहभागी होणे हा नियम आहे. परंतु चांदे यांना त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव नमनामध्ये सहभागी होता येत नाही. नमनामध्ये सहभागी न होणाऱ्या कुटुंबाला एक हजार रूपयाचे दंडाची रक्कम भरावी लागते. चांदे यांनी संबंधित दंडाची रक्कम भरली आहे. असे असतानादेखील वाडीने चांदे यांचे कुटुंब वाळीत टाकले आहे.संतोष चांदे यांना तीन वर्षाचा मुलगा आहे. सुयोग चांदे सध्या अंगणवाडीमध्ये शिकत आहे. चांदे कुटुंबियाशी कोण बोलेल किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवेल त्याला देवाजवळ गाऱ्हाणे घालून शिक्षा व्हावी, असा वाडीने नारळ दिला आहे. त्यामुळे वाडीतील एकही ग्रामस्थ चांदे कुटुंबियांशी बोलत नाही. इतकेच नव्हे तर सुयोग याच्याशी अंगणवाडीतील मुले, मुली बोलत नाहीत. त्यामुळे बालमनावर त्याचा परिणाम होत आहे. कामाच्या व्यापामुळे नमनात सहभागी होता येत नसल्याचा अर्ज देऊन दंडाची रक्कम भरली होती. तरीही चांदे व त्यांच्या कुटुंबीयांना वाळीत टाकल्याबद्दल महिला व मुलांसाठी सहायता कक्ष, रत्नागिरी यांच्याकडेही तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यावर संगमेश्वर पोलीस स्थानकात सहाय्यता कक्षाने पत्र पाठवून पोलीसपाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष यांना गावपातळीवर बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याबाबत सूचना करण्यात आली होती. तेव्हा पोलीसपाटील व तंटामुक्त समिती अध्यक्षांनी हे प्रकरण गावात मिटिंग घेऊन मिटवितो, असे सांगितले होते. मात्र, याबाबत त्यांनी मिटिंग बोलावलेली नाही, शिवाय कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.चांदे यांचा पुतण्या दहावीत शिकत आहे. पुतण्यासही काकाबरोबर बोलण्यास मज्जाव करण्यात आला. तो काकाशी बोलतो. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयासही वाळीत टाकण्यात आले आहे. वाडीच्या या कारभाराला कंटाळलेल्या चांदे कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करणार असल्याचे ठरविले आहे. (प्रतिनिधी)तंटामुक्त समितीकडेही केली तक्रार.पोलिसात तक्रार देऊनही न्याय मिळत नसल्याने संताप.पोलीस अधीक्षकांना देणार निवेदन.