शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सानुग्रह अनुदान, महागाई भत्ता न दिल्यास धरणे आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 17:25 IST

राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी) सर्व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्यात यावे आणि राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे तीन टक्के महागाई भत्ता तातडीने लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि.२५ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व विभागीय कार्यालये व मध्यवर्ती कार्यालयांसमोर धरणे आंदोलनाचा इशारा संघटनेतर्फे दिला आहे.

ठळक मुद्देसानुग्रह अनुदान, महागाई भत्ता न दिल्यास धरणे आंदोलनाचा इशारामहाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा निर्णय

रत्नागिरी : राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी) सर्व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्यात यावे आणि राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे तीन टक्के महागाई भत्ता तातडीने लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास दि.२५ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व विभागीय कार्यालये व मध्यवर्ती कार्यालयांसमोर धरणे आंदोलनाचा इशारा संघटनेतर्फे दिला आहे.राज्य सरकारच्या तरतुदीनुसार एस.टी कर्मचाऱ्यांना जुलै २०१९ च्या वेतनापासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ता लागू करण्याचे निश्चित केले होते. मात्र, अद्यापही वाढीव भत्ता लागू करण्यात आला नाही. हा भत्ता महागाईसह दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, अशी मुख्य मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.दरवर्षी कर्मचाऱ्यांना महामंडळातर्फे सानुग्रह दिवाळीपूर्वी वाटप केले जाते. मात्र, यावर्षी दिवाळी तोंडावर आली असली तरी सानुग्रह देण्यात आला नाही. त्यामुळे एस. टी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सणांपूर्वी उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य करण्यात आले होते.

त्यानुसार एस.टी महामंडळाने तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार रूपये उचल द्यावी व ऑक्टोबर महिन्याचे वेतन दि.२५ तारखेपर्यंत जमा करावे, अशा विविध मागण्या संघटनेने महामंडळाकडे करण्यात आल्या आहेत. या मागण्या दिवाळीपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे देण्यात आला आहे.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी