शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीपदाची अपेक्षा टांगणीला, उत्सुकता ताणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 14:26 IST

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेस यांचे संयुक्त महाशिवआघाडी सरकार स्थापन होणार की अन्य कोणाचे, याबाबतचा गुंता रात्री उशिरापर्यंत कायम असल्याने जिल्ह्यात लाल दिवा येणार की नाही, याबाबत गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे इच्छुकांना कभी खुशी कभी गम असा अनुभव येत आहे.

ठळक मुद्देमंत्रीपदाची अपेक्षा टांगणीला, उत्सुकता ताणलीसत्ता स्थापन होता होता शिवसेना पुन्हा एक पाऊल मागे

प्रकाश वराडकर रत्नागिरी : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेस यांचे संयुक्त महाशिवआघाडी सरकार स्थापन होणार की अन्य कोणाचे, याबाबतचा गुंता रात्री उशिरापर्यंत कायम असल्याने जिल्ह्यात लाल दिवा येणार की नाही, याबाबत गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे इच्छुकांना कभी खुशी कभी गम असा अनुभव येत आहे.सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंत शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाशिवआघाडी सत्ता स्थापन करण्याची आशा होती. त्यामुळे जिल्ह्यातील तीन शिवसेना आमदारांचे समर्थक उत्साहाने सरसावले होते. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी याआधी मंत्रीपद अनुभवले आहे. त्यामुळे त्यांची नावे आणि सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले म्हणून राजापूरचे आमदार राजन साळवी ही तीन नावे प्राधान्याने चर्चेत आली.गेल्या १८ दिवसांपासून सत्तेचे राजकारण वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपने असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस यांचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. सोमवारी रात्री साडेसात वाजेपर्यंत शिवसेनेला मुदत देण्यात आली होती. त्यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याचे वृत्त पुढे आले आणि त्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंद व्यक्त केला गेला.रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने विधानसभेच्या पाचपैकी ४ जागांवर विजय मिळविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला दोन मंत्रीपदे मिळतील, अशी चर्चा आधीपासूनच होती. शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, राजापूरचे आमदार राजन साळवी तसेच गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे तिघेजण मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल होऊन विजयीही झाले. मात्र, पाच वर्षांच्या काळात सामंत यांना मंत्रीपद मिळाले नाही. विधानसभा कार्यकाळाच्या शेवटी काही महिने उरले असताना त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद मिळाले. त्यामुळे दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना शिवसेनेतर्फे लाल दिव्याची गाडी हमखास मिळेल, असा दावा केला जात आहे.दुसरीकडे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी हे यावेळी मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राजन साळवी यांना यावेळी मंत्रीपदापासून डावलता येणार नाही, अशी चर्चा आहे. मात्र साळवी यांना डावलले गेल्यास त्याचा शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे साळवी यांची लाल दिव्याची गाडी पक्की मानली जात आहे.

सामंत, साळवी यांच्याबरोबरच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत आलेले व विजयी झालेले आमदार भास्कर जाधव यांनाही मंत्रीपद मिळेल, असा दावा समर्थकांमधून केला जात आहे. मात्र सायंकाळी उशिराच्या घडामोडींमुळे सेना आमदारांची मंत्रीपदाची प्रतीक्षा वाढली आहे.मंत्रीपदाची प्रतीक्षा कायमएका बाजूला मंत्रीपदाची गणिते मांडली जात असताना दुसरीकडे महाशिवआघाडीची गणिते फिस्कटल्याचे चित्र तयार झाले आहे. शिवसेनेने मुदतीत दावा न केल्यामुळे त्यांना सत्तेपासून लांब राहावे लागणार आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांची मंत्रीपदाची प्रतीक्षा कायम राहणार असल्याचे दिसत आहे. त्याजागी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.शेखर निकम यांना संधी?या विधानसभा निवडणुकीत चिपळूणमध्ये किल्ला लढवित राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी विजय मिळविला. निष्ठावान कार्यकर्ता तसेच माजी खासदार गोविंदराव निकम यांचे सुपुत्र अशी त्यांच्याबाबतची प्रतिमा आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी त्यांनाही लाल दिव्याची गाडी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणRatnagiriरत्नागिरी