शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सरदार पटेल यांचे जीवन चरित्र समजून घेण्याची गरज : धनंजय कुलकर्णी

By शोभना कांबळे | Updated: October 30, 2023 18:19 IST

हे प्रदर्शन ३ नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले

रत्नागिरी : सरदार पटेल यांचे जीवन चरित्र सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे आणि अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून यासाठी खूप मदत होऊ शकेल, असे हे आगळे वेगळे प्रदर्शन आयोजित करणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरोचे कौतुक करावे लागेल, असे गाैरवोद्गार रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले.राष्ट्रीय एकता दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि कोकण रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे विभागस्तरीय प्रदर्शन येथील कोकण रेल्वे स्थानकावर आयोजित करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील या मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.यावेळी पोलीस अधीक्षकांनी प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस ११२ हेल्पलाइन तसेच जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉल्सना भेट दिली. हे प्रदर्शन ३ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी पोलिस अधीक्षक यांनी केले.या प्रदर्शनात विविध कलापथकांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील माहिती मल्टीमीडिया माध्यमातून उपस्थितांना घेता येईल. व्हीआर गॉगल्स, प्रश्नमंजुषा आणि ३६० डिग्री सेल्फी बुथ यावेळी प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहे.देशाच्या एकीकरणाचे शिल्पकार असलेल्या सरदार पटेल यांच्या जीवनाची सर्वसामान्यांना दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून माहिती घेता यावी या उद्देशाने हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक, स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी आणि इतर विद्यार्थ्यांनी या विभागस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश चोपडे यांनी केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी