शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

चार गावातील महिलांची कसरत

By admin | Updated: April 15, 2015 23:57 IST

भीषण पाणीटंचाई : संगमेश्वरमध्ये धावू लागला आणखी एक टँकर

फुणगूस : दिवसेंदिवस पाणीटंचाई उग्र रुप धारण करत असून, संगमेश्वर तालुक्यातील टंचाईग्रस्त चार गावे व चालर वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाचांबे गावातील जखीण देव वाडीलाही आता पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे. सध्या असलेला एक टँकर तालुक्याला अपुरा पडत असल्याने प्रशासनाकडून आणखी एका टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईला सुरूवात झाली होती. मात्र आता तर पाणीटंचाईने आणखी थैमान घालण्यास सुरूवात केली आहे. तालुक्यातील चार गावातील चार वाड्यांना ही पाणीटंचाई जाणवत असली तरी या चारही गावातील चार वाड्यांमध्ये असलेली परिस्थिती भीषण असल्याचे दिसून येते. शासकीय टँकर ज्यावेळी पाणी घेऊन येतो, त्यावेळी पिण्यापुरते पाणी मिळेल की नाही, याचीही शाश्वती नसते, एवढी झुंबड या टँकरभोवती उडते. त्यामुळे पिण्यापुरते पाणी मिळवतानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. एका वाडीला लागेल एवढेही पुरेसे पाणी मिळत नसताना ग्रामस्थांची विशेष करून महिलांची मोठी कुचंबणा होत असल्याचे दिसून येते.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दि. २ एप्रिलपासूनच संगमेश्वर तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील पाचांबे (नेरदवाडी), धामापूरतर्फ देवरुख (चव्हाणवाडी), फुणगूस (घडशेवाडी), बेलारी (माचीवाडी) या वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. आता पाचांबे जखीणदेव वाडीलाही पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांच्याकडून टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या प्रशासनाकडे सादर केलेल्या अर्जाची दखल घेत तहसील तसेच पंचायत समितीने येथे संयुक्त पाहणी करुन टँकर सुरु करण्याचा निर्णय घेतला.तालुक्यातील टँकरची मागणी पाहता एका टँकरवर ताण पडत आहे. याची दखल संगमेश्वर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांनी घेतली असून, संगमेश्वर तालुक्यासाठी आणखी एका टँकरची व्यवस्था करुन दिल्याने टंचाईग्रस्त वाड्यांना काहीअंशी दिलासा मिळत आहे. (वार्ताहर)घसा कोरडाटँकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा.पाचांबे जखीणदेव वाडीलाही पोहोचली पाणीटंचाईची झळ.एक टँकर अपुरा पडत असल्याने प्रशासनाकडून आणखी एका टॅकरची व्यवस्था.२ एप्रिलपासूनच संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईला सुरूवात.टँकरभोवती उडतेय महिलांची झुंबड.