दापाेली : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्रतर्फे Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य व गौरव सप्ताह साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने शाळास्तरावर निबंध लेखन, काव्य लेखन, काव्य वाचन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन आयोजन करण्यात आले होते.
ज्यामध्ये नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, हर्णैच्या विद्यार्थ्यांबरोबरच जिल्हा परिषद उर्दू केंद्रीय शाळेच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला हाेता. या कार्यक्रमाची सुरुवात निहाल काजी यांनी कुराण पठणने केली. त्याचा उर्दू अनुवाद ताहा काजी यांनी केला तर इंग्रजी अनुवाद अर्शद पारेख यांनी केला. सूत्रसंचालन इंग्रजीचे शिक्षक इब्राहीम कुमनाळी यांनी इंग्रजी भाषेत उत्तमप्रकारे केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दि हर्णै एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीचे सचिव हसनमियाॅं साखरकर यांनी भूषविले. परीक्षक म्हणून एन. डी. गोळे हायस्कूलचे कलाशिक्षक म. अ. सागवेकर यांनी काम पाहिले. जिल्हा परिषद शाळा उर्दूचे मुख्याध्यापक सलाम आराई, शाहीन बामणे यांनी आभार मानले. मुबीन बामणे, संस्थेचे सचिव हसनमियाॅं साखरकर यांनी मनाेगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला दि हर्णै एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीचे सचिव हसनमियाॅं साखरकर, सहसचिव निसार अहमद हुनेरकर, सदस्य सईद चिकटे, जिल्हा परिषद उर्दूचे मुख्याध्यापक सलाम आराई, नॅशनलचे मुख्याध्यापक असिफ भाटकर, मुबीन बामणे, इब्राहिम कुमनाळी, ओंकार, यासिन नांदगावकर उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धा मराठी भाषा - प्रथम क्रमांक : आयेशा शफी मेमन, द्वितीय : सलवा वसिम काजी, तृतीय : अरफा अख्तर जमादार, उर्दू भाषा मसिरा शबीम मेमन, इंग्रजी भाषा - प्रथम : अन्शा अल्ताफ मजगावकर, द्वितीय : आलिया नसिम खान, तृतीय : अहमद मुबीन बामणे. निबंध लेखन उर्दू - प्रथम : मिस्बा रिजवान करबेलकर, द्वितीय : आलिया शब्बीर डवलकर, तृतीय : मदिहा झहीर चिकटे. निबंध लेखन इंग्रजी - प्रथम : मफाजा सिकंदर मेमन, द्वितीय : अशना असिफ अकबानी, तृतीय : आनम इम्तियाज चिमावकर. चित्रकला - प्रथम : रिमा शेख अहमद हुनेरकर, द्वितीय : रिफत सुफयान बाणकोटकर, तृतीय : सादिया इब्राहिम कुमनाळी.