शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

परीक्षेचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:31 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुलांना सुट्टी असली, तरी आम्हाला सुट्टी नाही. शाळा बंद झाली आणि लगेच आमची ‘कोविडयोद्धा’ ड्युटी सुरू ...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुलांना सुट्टी असली, तरी आम्हाला सुट्टी नाही. शाळा बंद झाली आणि लगेच आमची ‘कोविडयोद्धा’ ड्युटी सुरू झाली. आमच्यातले कोणी पोलीसमित्र बनले, कोणी आरोग्यमित्र तर कोणी डाटा एण्ट्री ऑपरेटर. गेल्या काही दिवसांपासून मी पोलीसमित्र म्हणून काम करत आहे. धोकादायक ठिकाणी दिवसभर उन्हात माझ्यासारखेच इतर शिक्षक हे कर्तव्य निभावत आहेत. या कामाचे ना कसले प्रशिक्षण, ना कसली पूर्वतयारी, ना कसले संरक्षककवच... थेट ड्युटीवर हजर! आता घरातले खूप काळजी करतात. संध्याकाळी घरात पाय ठेवताना बायको, मुलं भीतियुक्त साशंक डोळ्यांनी माझ्याकडे बघत राहतात. कोरोनाच्या निर्बंधांमुळे आई गावाकडे अडकलेली. इकडच्यातिकडच्या दुःखद वार्ता कानांवर पडल्या की, पार खचून जाते. ना आम्ही तिच्याकडे जाऊ शकत, ना ती आमच्याकडे येऊ शकत... खरेच, सध्याचा काळ खूप गंभीर आहे. याच काळात दररोज सकाळीच न चुकता ‘उठा माऊली, सुप्रभात...!’ म्हणून व्हाॅट्सॲपवर मेसेज

पाठविणारे अगदी जीवाभावाचे व खूप प्रेमळ असलेले मित्रवर्य काळाच्या पडद्याआड गेले. कोणतेही नातेसंबंध नसताना परस्परांना जीव लावणारी अशी तरुण, धडधाकट माणसे अचानक निघून गेल्यावर कसे वाटते? केवळ ‘भावपूर्ण श्रद्धांजली’चे दोन शब्द टाकून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करता येत नाही.

एखाद्या कुटुंबाचा आधारवड असा अनपेक्षितपणे उन्मळून पडला की, किती मोठा खड्डा पडतो, तो ज्याचा त्यालाच माहीत. याच काळात माझे एक सहकारी कोरोनाबाधित झाले. पोटापाण्यासाठी कुठूनकुठून एकत्र आलेले. आम्ही एखाद्या वेळेस भांडतो, रुसतो पण दुस-याच क्षणी झाले गेले विसरून परस्परांना ‘हाय... हॅलो...’ करतो. चार-पाच दिवसांपूर्वी एकाच गाडीवरून फिरलेलो आम्ही... पण, त्यांची तेव्हाची अवस्था बघून मी पार खचून गेलो. खूप धावपळ केली तेव्हा कुठे त्यांच्यावर त्वरित उपचार झाले. देवदयेने माझे सहकारी आता पूर्ण बरे होऊन घरी आलेत. पण, त्या आठवडाभरात आमचा संपूर्ण स्टाफ ना पोटभर जेवला, ना मनसोक्त झोपला. काय होईल, कसे होईल, याचीच काळजी. खरेच कठीण परीक्षेचे दिवस सुरू झालेत. माझ्या फेसबुक वाॅलवर माझ्या साहित्यविषयक पोस्टवर आवर्जून अभिप्राय देणारा कधी पाठीवर कौतुकाची थाप, तर कधी एखादा सल्ला देणारा माझा एक आदर्श मित्र असाच अकाली हे जग सोडून गेला. कालपरवा माझ्या पोस्टवर टाइप केलेली त्याची ती बोटे अजूनही तशीच हलत असतील. पण, काळाच्या मनात काय दडलेले असते, ते फक्त काळालाच माहीत. याच कालौघात आपलेही असेच जाणे झाले तर...

मागच्यांचे काय होईल, या भीतीने रात्री झोप लागत नाही. खरेच, अतिशय खडतर व कठीण परीक्षेचे दिवस आहेत.

- बाबू घाडीगावकर, जालगाव, दापोली