शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील हातिवले येथील टोलवसुली स्थगित करेपर्यंत जागेच हलणार नाही, नीलेश राणेंचा इशारा

By मनोज मुळ्ये | Updated: December 22, 2022 12:49 IST

टोलवसुली सुरू करण्यात आल्याने सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिक आक्रमक

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असतानाही राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोलवसुली सुरू करण्यात आल्याने सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिक आक्रमक झाले असून, माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी सकाळपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत टोलवसुली स्थगित केली जात नाही, तोपर्यंत येथून कोणीही हटणार नाही, अशी ठाम भूमिका राणे यांनी घेतल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले आहे.याआधीही हातिवले येथे टोलवसुली सुरू करण्यात आली होती. मात्र स्थानिकांनी विरोध करुन ती बंद पाडली. बुधवार २१ डिसेंबरला अचानक ती पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे लोक आक्रमक झाले. टाेलवसुलीचा विषय वाऱ्यासारखा पसरला आणि सर्वपक्षीय लोक तेथे दाखल झाले. तेथूनच माजी खासदार नीलेश राणे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आपण गुरुवारी सकाळी १० वाजता येत आहोत, त्यावेळी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असे राणे यांनी सांगितले. त्यामुळे बुधवारी टोलवसुली थांबण्यात आली.गुरुवारी सकाळपासूनच सर्वपक्षीय कार्यकर्ते हातिवले येथे जमा झाले. नीलेश राणे यांच्यासह काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफेही तेथे हजर झाल्या. शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे अशा सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. आमचा टोलवसुलीला विरोध नाही. मात्र जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही टोलवसुली करु देणार नाही, असे राणे यांनी ठणकावून सांगितले. जोपर्यंत टोलवसुली थांबवली जात नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दुपारपर्यंत यातून कोणताच मार्ग न निघाल्याने सर्व लोक तेथेच थांबून होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtollplazaटोलनाकाNilesh Raneनिलेश राणे