शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

आजही ग्रामस्थांना डोलीचाच आधार!

By admin | Updated: October 23, 2016 00:28 IST

गुहागर तालुका : आधुनिक युगातही काजुर्ली - खडपेवासियांच्या पदरी निराशा

अमोल पवार -- आबलोली --देशात ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला जात आहे. ‘डिजिटल इंडिया’ घडविण्याचे स्वप्न राज्यकर्ते पाहात आहेत. मात्र, याचवेळी ग्रामीण भागातील स्थिती अनेक ठिकाणी विदारक असल्याचे दिसून येत आहे. गुहागर तालुक्यातील काजुर्ली (खडपेवाडी) येथील ग्रामस्थ आजही रस्त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे आजही येथील ग्रामस्थांना रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी ‘डोली’ उचलावी लागत आहे.गुहागर तालुक्याच्या दक्षिणेकडील टोकाकडचे दुर्गम गाव म्हणून काजुर्लीची ओळख आहे. मात्र, जिल्ह्याचे ठिकाण व गुहागर तालुका यांना जोडणारा भातगाव - राई हा पूल झाल्यानंतर काजुर्ली हे गाव रत्नागिरी ते गुहागर या प्रमुख मार्गावरील महत्त्वपूर्ण गाव बनले आहे. या गावातील अनेक वाड्या या दुर्गम भागात वसलेल्या असून, येथे लोकसंख्याही विरळ आहे. यातील खडपेवाडीमध्ये सुमारे १५ घरे असून, येथे कायम वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांची संख्या अंदाजे ३० एवढी आहे. सण - उत्सवानिमित्तच गावाबाहेर असलेली मंडळी वाडीत येतात. मात्र, सण संपताच पुन्हा नेमकीच माणसे वाडीत शिल्लक राहतात. आज शासन ‘मेक इन इंडिया’चा नारा देत असताना या वाडीत अजूनही रस्त्याचा पत्ता नसल्याने जर कुणी आजारी पडले, तर त्याला डोलीतून उचलून दोन किलोमीटर चालत गुहागर - काजुर्ली - रत्नागिरी या मुख्य रस्त्यावर आणावे लागते आणि तेथून पुढील उपचारांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी न्यावे लागते. त्यातच प्रमुख रस्त्याकडे जाणारी पाऊलवाटही निमुळतीच आहे. लहान मुलांचा पाळणा या डोलीसाठी वापरला जातो. यामध्ये पाळण्याच्या दोन्ही बाजूला घट्ट असे बांबू बांधले जातात व त्या पाळण्यात रुग्णाला बसविले जाते आणि मग ही डोली उचलून खांद्यावरुन वाहून नेली जाते. ही डोली उचलणारी माणसेसुद्धा बहुतेकवेळा वयस्करच असतात. कारण वाडीतील बहुतांशी तरुण हे कामानिमित्त बाहेरगावी आहेत. वाडीत येण्या-जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राजकीय वर्चस्वासाठी येथील ग्रामस्थांचा केवळ वापर करण्यात आल्याचेच आजपर्यंत दिसून आले आहे.निवडणुकीत केवळ आश्वासनांचा महापूरविविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी या वाडीसाठी रस्ता करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्या सर्व वल्गनाच ठरल्या. ग्रामपंचायतीने काही निधी खर्च टाकून रस्त्याचे कच्चे प्रारुप तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुरेशा निधीअभावी हा रस्ता अपूर्णच राहीला. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा कुणीतरी येऊन आश्वासने देतील व वाडीतील सुमारे ३० मते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर पुन्हा विसरतील. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या खांद्यावरील डोलीचे ओझे उतरेल की नाही? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.