शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

पंधरवड्यानंतरही नौका बंदरातच, मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:38 IST

मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी मासेमारी ठप्पच आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे एकीकडे खलाशी नाहीत, तर दुसरीकडे कोरोनाचे संकट, मासेमारी बंदचा इतर व्यवसायांवर परिणाममच्छीमार सापडले आर्थिक संकटात, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, वारा थांबण्याची प्रतीक्षा

रत्नागिरी : मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी मासेमारी ठप्पच आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मागील मासेमारी हंगाम वादळानंतर कोरोनामुळे तोट्यात गेला होता. कोरोनाच्या भीतीने मासेमारी बंद ठेवावी लागली होती. मासेमारीच्या शेवटच्या दिवसांमध्ये मासे चांगल्या प्रमाणात मिळतात. मात्र, ऐन हंगामात कोरोनामुळे मासेमारी बंद झाल्याने खलाशीही हा हंगाम अर्धवट सोडून गेले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या मासेमारी व्यवसायावरच अवकळा पसरली होती.दरम्यान, मागील हंगामात झालेले नुकसान चालू मासेमारी हंगामामध्ये भरून निघेल, या मच्छिमारांच्या आशेवर कोरोनासह सततच्या वादळी वातावरणाने पाणी फेरले आहे. कोरोनाच्या भीतीने खलाशी न परतल्याने सुमारे ८५ टक्के मासेमारी नौका अजूनही बंद स्थिती आहेत. मात्र, ज्या नौकांनी मासेमारी सुरु केली त्यांना निसर्गाने मोठा फटका दिला.

गेल्या पंधरवड्यामध्ये अनेकदा झालेल्या हवामानातील बदलामुळे मासेमारीला खोल समुद्रात जाणे धोकादायक ठरु शकते, त्यासाठी हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांमुळे बहुतांश मालकांनी नौका नांगरावर ठेवण्यातच धन्यता मानली.मासेमारी ठप्प झाल्याने त्याचा परिणाम त्यावर अवलंबून असलेल्या टेम्पो, रिक्षा, पानपट्टी व अन्य व्यवसायावर झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसामुळे बहुतांश नौका नांगरावर आहेत. त्यामुळे बाजारात माशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातच कोरोनामुळे इतर राज्यात होणारी माशांची आयात-निर्यात बंदच झाली आहे. 

खोल समुद्रातील मासेमारीची हीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल. आजही स्थिती फार बिकट आहे. मागील हंगाम कोरोनामुळे तोट्यात गेला. आजही कोरोनाच्या संकटासह वादळी वातावरणामुळे मासेमारी ठप्पच आहे. त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने मच्छिमारांकडे लक्ष देण्याची गरज आहे.- निसार दर्वे, मच्छीमार नेते, रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार