शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतरही जिल्ह्यातील वाद्यांचा आवाज अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 12:54 IST

शोभना कांबळे रत्नागिरी : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन सुरू झाले. गेल्या साडेसात ते आठ महिन्यांपासून ...

ठळक मुद्देकोरोनानंतरही जिल्ह्यातील वाद्यांचा आवाज अद्याप बंदच धार्मिक कार्यक्रमांना अजूनही बंदी, व्यवसाय ठप्पच

शोभना कांबळेरत्नागिरी : मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन सुरू झाले. गेल्या साडेसात ते आठ महिन्यांपासून धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने लग्न समारंभ, राजकीय, धार्मिक मिरवणुका, मंदिरांचे जीर्णोद्धार असे कार्यक्रम थांबले आहेत. याचा परिणाम विविध वाद्य व्यावसायिकांवर झाला आहे. ढोल - ताशे, बँजो, डी. जे. पथकांना अजूनही परवानगी नसल्याने या व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली, मात्र लग्न वा इतर धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने हे व्यावसायिक शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत.लग्नसराईवरही मर्यादासध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लग्न समारंभाला सुरूवात झाली असली, तरी त्यासाठी केवळ ५० व्यक्तींची मर्यादा ठेवण्यात आल्याने अनेकांनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या. सांस्कृतिक कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिली. मात्र, धार्मिक कार्यक्रमांवर बंदीच आहे. त्यामुळे वाद्यांबरोबरच मंडप डेकोरेटर्स, साऊंड, मंगल कार्यालये, कॅटरर्स यांचेही व्यवसाय अडचणीत आले आहेत.यावर्षीचे मुहूर्त२७, २८ नोव्हेंबर, ७, ८, ९, १७, १९, २३, २४, २७ डिसेंबर, ३, ५, ६, ७, ८, ९, १० जानेवारी, १५, १६ फेब्रुवारी, २२, २४, २५, २६, २८, २९, ३० एप्रिल, १ ते ५, ८, १३, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ मे, ४, ६,१६, १९, २०, २६, २७, २८ जून, १, २, ३, १३ जुलै.

सध्या कुठलेही कार्यक्रम होत नसल्याने आमच्या व्यवसायांवर गंडांतर आले आहे. मंडप डेकोरेटर्स, साऊंड सिस्टीम अशा सर्वच व्यवसायांवर मंदीची लाट आली आहे. कार्यक्रमांना परवानगी मिळण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे.- पॉल खेडेकर,नीलतारा बँजो पार्टी, रत्नागिरी.

गेल्या साडेसहा महिन्यांपासून कार्यक्रम बंदच असल्याने सर्व साहित्य गोडावूनमध्येच आहे. आता सुरूवात नव्याने करायची झाली तर सुमारे ६० -७० हजार रूपयांचा खर्च करावा लागणार आहे. त्याशिवाय आता पथकातील मुले येतील किंवा नाही, हेही पाहावे लागणार आहे. सर्व सेटअप नव्याने बसवावा लागणार आहे.- रूपेश पेडणेकर, शिवरूद्र ढोलपथक, रत्नागिरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी