शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
4
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
5
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
6
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
7
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
8
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
9
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
10
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
11
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
12
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
13
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
14
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
15
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
16
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
17
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
18
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
19
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
20
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल

दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी, तेल तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:37 AM

CoronaVirus, Diwali, Oil, ratnagiri कोरोनामुळे विविध उद्योग, व्यवसाय अडचणीत आल्याने कित्येकांच्या रोजगाारावर परिणाम झाला आहे. आर्थिक झळ सोसत असतानाच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे पुरते मोडले आहे. दिवाळीचा सण तोंडावर असतानाच सर्वसामान्यांना महागाईची फोडणी बसली आहे.

ठळक मुद्देदिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी, तेल तापलेभरमसाठ वाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले

रत्नागिरी : कोरोनामुळे विविध उद्योग, व्यवसाय अडचणीत आल्याने कित्येकांच्या रोजगाारावर परिणाम झाला आहे. आर्थिक झळ सोसत असतानाच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे पुरते मोडले आहे. दिवाळीचा सण तोंडावर असतानाच सर्वसामान्यांना महागाईची फोडणी बसली आहे.कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने खासगी आस्थापनातील कित्येकांना नोकरी, रोजगार गमवावे लागले. गेल्या दोन महिन्यांपासून उद्योग, व्यवसाय हळूहळू सुरू झाले असले तरी नोकरी मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे तयार पिकांचे नुकसान झाल्याने येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच अचानक खाद्यतेल, डाळी, कडधान्य यांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे.खाद्यतेलाची किंमतही गेल्या महिन्याच्या तुलनेत १५ ते २० रूपयांनी वाढली आहे. डाळींच्या किमतीत १० ते १५ रूपये, कडधान्यांच्या किमतीत १२ ते १५ रूपयांनी वाढ झाली आहे. जूनपासून चहा पावडरचे दर तर किलोमागे ४० ते ५० रूपयांनी वाढले आहेत. कांदा, बटाट्याच्या दराने तर उच्चांक गाठला आहे. दिवाळीच्या फराळासाठी लागणारे साखर, रवा, मैदा, खोबरे यांचे दर मात्र सध्या स्थिर आहेत.कांदा ८५ ते १२० रूपये, बटाटा ५५ ते ८० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. दिवाळीत तेल, डाळींचा वापर सर्वाधिक होत असल्याने नेमकी याचवेळी दरात झालेली वाढ ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत आहे.

कोरोनामुळे आधीच दिवाळं वाजलं असतानाच महागाईचा भस्मासूर उसळला आहे. नित्याचा डाळ-भातच महागला असून, फराळाच्या जिन्नसाला तर महागाईची झणझणीत फोडणी बसली आहे. दरवाढीवर शासनाने नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे.- अनिता यशवंत पवार, गृहिणी

जिल्ह्यात विक्रीसाठी येणारा किराणा माल हा वाशी व कोल्हापूर येथून येत आहे. जागेवरच दरात वाढ झाली आहे. त्यामुळे वाढीव दराने विकणे क्रमप्राप्त होत आहे. दर वाढल्यामुळे खरेदीवर परिणाम झाला आहे.- ए. एस्. शेट्ये, विक्रेता.

टॅग्स :DiwaliदिवाळीOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पRatnagiriरत्नागिरी