शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

एस्. टी. बसमधील वायफाय सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 15:40 IST

देवरूख : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस. टी. बसमध्ये ग्राहकांना मोफत वायफाय सेवा देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला.

ठळक मुद्देजाहीरातींचे लावलेले फलक फसवे सेवा मिळत नसल्याची प्रवाशांची ओरडयंत्रणेकडून दिरंगाई होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे

देवरूख : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एस. टी. बसमध्ये ग्राहकांना मोफत वायफाय सेवा देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. निर्णय झाल्यावर अनेक बसेसमध्ये वायफाय सेवा असलेली बस असल्याचे फलक लावण्यात आले. शिवाय वायफायचे इन्स्ट्रुमेण्ट बसवण्यात आले. परंतु एस. टी.च्या प्रवाशांना वायफाय सेवा मिळत नसल्याची प्रवाशांची ओरड आहे.एस. टी. बसमध्ये वायफाय सेवा सुरू असल्याचे जाहीरातींचे लावलेले फलक फसवे असल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे.एस. टी.मध्ये वायफाय सेवा सुरू करून प्रवाशांना आकर्षित करण्याचा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा प्रयत्न आहे. एस. टी. बसेसमध्ये कार्यान्वित करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर सोपवण्यात आली, त्यांच्याकडून दिरंगाई होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.कॉईन बॉक्सच्या जमान्यात मोठा गाजावाजा करत एस. टी.ने बसेसमध्ये कॉईन बॉक्स बसवले होते. परंतु कॉईन बॉक्सवरून कुठल्याही ग्राहकाचा केव्हा कॉलच लागला नसल्याचा इतिहास आहे. परिणामी ते कॉईन बॉक्स काढून टाकावे लागले.सध्या वायफायच्या जमान्यात बसेसमध्ये वायफायची इन्स्ट्रुमेंट लावून प्रवाशांना आकर्षित करण्याचे गाजर दाखवले आहे. मनोरंजन, मस्ती और धमाल, आपका मोबाईल आपका थिएटर आदी बोगस जाहीराती लावण्यात आल्या आहेत.शिवाय वायफाय नेटवर्क आपल्या मोबाईलसाठी कसे कार्यान्वित करावे, यासाठी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. त्यामध्ये आरामात बसा व चित्रपट आणि कार्यक्रमांचा आनंद आपल्या मोबाईलमध्ये लुटा, असे लिहिण्यात आले आहे.परंतु ज्याठिकाणी सेवाच मिळत नाही तिथे या जाहिरातींचे फलक काय कामाचे? असा सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे. जाहिरातींचे जे फलक लावण्यात आले आहेत, त्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी स्टीकर लावण्यात आले आहेत. ते काढताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीदही देण्यात आली आहे.