शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: राजापूर तालुक्यातील अनेक गावांत अनोळखी व्यक्ती, फेरीवाले, भंगारवाल्यांना प्रवेशबंदी; कारण काय.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:43 IST

वेशीवर लावले फलक, प्रशासन काय करणार?

राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील महिलेचा खून, कोळवणखडी येथील घरफोडी आणि अनेक दिवस उलटूनही आरोपी न सापडणे यांसारख्या घटनांमुळे तालुक्याच्या पूर्व भागात भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील अनेक ग्रामपंचायतींनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून गावामध्ये येणारे फेरीवाले, भंगारवाले, भोंदू बाबा यासह अनोळखी व्यक्तींना गावामध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. जर अशा व्यक्ती गावात आढळल्यास तत्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, असा इशारा देणारा फलक बुधवारी गावांच्या वेशीवर लावण्यात आला आहे.कोरोना काळात सामाजिक अंतर राखण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या काळात गावात कोणीही प्रवेश करू नये, यासाठी गावांच्या वेशीवर प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आले होते. आता तशी स्थिती नसली तरी चोऱ्या, खून यांसारख्या प्रकारांमुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांनी अनोळखी लोकांना गावात प्रवेश नाकारला आहे.रायपाटण येथील वैशाली शेट्ये या महिलेचा खून होऊन दोन महिने झाले आहेत. कोळवणखडी येथे घरफोडीची घटना घडली आहे. याव्यतिरिक्त तालुक्याच्या काही भागात घरफोड्यांचे प्रकार घडले आहेत. या वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे राजापूर तालुक्याच्या पूर्व परिसरातील येळवण, कोळवण खडी, रायपाटण, तळवडे यासह अनेक गावांत तेथील ग्रामपंचायतींनी गावात प्रवेश करणाऱ्या अनोळखी व्यक्ती, फेरीवाले, भंगारवाले, भोंदू बाबा यांना गावात प्रवेश करण्यास सक्त मनाई करणारे फलक लावले आहेत.प्रशासन काय करणार?गावामध्ये असा प्रवेश नाकारणे कायद्याला धरून नसल्याने आता तालुका प्रशासन, पोलिस काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri villages ban strangers after crimes spark fear, security concerns.

Web Summary : Following recent crimes, Ratnagiri's Rajapur villages ban entry to strangers, vendors, and scrap dealers. Gram panchayats put up warning signs, citing safety concerns due to unsolved crimes, including murder and burglary. The administration is now evaluating the legality of these restrictions.