शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 14:34 IST

Nanar refinery project, ratnagiri news इथल्या बेरोजगारीचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल, राजापूर बाजारपेठेला पुन्हा ऊर्जितावस्था आणायची असेल तर आपल्या दाराशी आलेला रिफायनरी प्रकल्प हातचा जाऊ द्यायचा नाही, असा वज्रनिर्धार सर्वपक्षीय नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्देनाणार रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थकांचा एल्गारराजापुरात सर्वपक्षीय बैठक

राजापूर : इथल्या बेरोजगारीचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल, राजापूर बाजारपेठेला पुन्हा ऊर्जितावस्था आणायची असेल तर आपल्या दाराशी आलेला रिफायनरी प्रकल्प हातचा जाऊ द्यायचा नाही, असा वज्रनिर्धार सर्वपक्षीय नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ बैठकीत करण्यात आला.येथील राजापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली राजापुरात रविवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेकर, सचिव अविनाश महाजन, भाजप तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आबा आडिवरेकर, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, ज्येष्ठ व्यापारी मजीद पन्हळेकर, शिवसेनेचे राजा काजवे, भाजपचे वसंत पाटील, व्यापारी संघाचे दीनानाथ कोळवणकर उपस्थित होते.

अविनाश महाजन यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी हा प्रकल्प तालुक्यात होणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. अभिजीत गुरव यांनी हा प्रकल्प ज्या भागात होत आहे. त्या सर्व ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन प्रकल्प समर्थनार्थ उभे राहिले पाहिजे, असे सांगितले.

हनिफ काझी यांनी जे सनदशीर मार्गाने मागून मिळत नाही ते संघर्षातून मिळविण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशी रोखठोक भूमिका मांडली. नाणार प्रकल्पासंदर्भात आता सर्वांनी मिळून निर्णायक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे शशिकांत सुतार यांनी सांगितले. सूत्रसंचालन नीलेश पाटणकर यांनी केले.समर्थनार्थ एल्गारप्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती जाणून न घेता प्रकल्पाला होणारा विरोध हा राजकीय आहे. तो तालुक्याच्या भवितव्याला हानिकारक आहे. हे सत्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रकल्प समर्थनार्थ एल्गार करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी