शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

सुमारे 13 लाखांची वीज चोरी, खेडमधील तळघर येथील प्रकार

By संदीप बांद्रे | Updated: May 27, 2024 22:26 IST

चिपळूण पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल

संदीप बांद्रे / चिपळूण-  गेल्या पंधरा महिन्यांपासून 76 हजार 93 युनिट्स चा वापर करत महावितरणचे 13 लाख 34 हजार 390 रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील तळघर येथे घडला आहे. याप्रकरणी रामचंद्र भागोजी बुदार व राकेश रामचंद्र बुदार या दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. 

या संदर्भात महावितरणच्या पेण येथील भरारी पथकातील उपकार्यकारी अभियंता विजय राजेश धरमसारे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे 24 एप्रिल 2024 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या कारवाईला सुरुवात झाली. लोटे एमआयडीसी उपविभाग रत्नागिरी जिल्हा यांच्या आख्यारीत येणाऱ्या खेड तालुक्यातील तळघर या परिसरातील वीज चोरी शोधून काढण्यासाठी स्वतः विजय धरमसारे तसेच सहाय्यक अभियंता आशिष मेश्राम, सहाय्यक व अधिकारी शशीकुमार तांबे ,वरिष्ठ तंत्रज्ञ राकेश पाटील यांच्या पथकाने वीज ग्राहक रामचंद्र भागोजी बुदार व वापरदार राकेश रामचंद्र बुदार यांचा ग्राहक क्रमांक 22 23 60 00 20 58 या चिरेखानीच्या वीजपुरवठा असलेल्या विज संचाची तपासणी केली. यामध्ये या मीटर मधून वापरत असलेल्या वीज पुरवठ्यासंबंधी सदर वीज मीटर हाताळलेला पाहायला मिळाला.

या मीटरच्या  टर्मिनलचे स्क्रू ढिले करून ग्राहक हा मीटर डिस्प्ले व पल्स बंद करत असल्याचे आढळून आले. जेणेकरून वीज वापराची नोंद वीज मीटरमध्ये नोंद होणार नाही अशा प्रकारे वीज मीटर मध्ये छेडछाड केल्याचे दिसून आल्यानंतर राकेश रामचंद्र बुदार यांनी पोटेन्शिअल टर्मिनलचे स्क्रू ढिले करून व केबल हलवून मीटर चालू बंद करत असल्याचे मान्य केले. तसे प्रत्यक्षित सुद्धा त्यांनी पथकासमोर करून दाखवला. अनधिकृतपणे विजेचा  वापर करणाऱ्या विजग्राहक रामचंद्र बाबूजी बुदार व वापरदार राकेश रामचंद्र बुदार त्याच्या वीज मीटरच्या साह्याने वीज चोरी करत होते. ते वीज मीटर पंचांच्या समक्ष सील करून ताब्यात घेतले गेले.

अनधिकृतपणे विजेचा वापर गेल्या पंधरा महिन्यांपासून म्हणजेच जानेवारी 2023 ते मार्च 2024 या कालावधीत झाला असून 76 हजार 93 युनिट्स वीज चोरून वापरली गेली आहे. तब्बल 13 लाख 34 हजार 390 रुपयांची वीज चोरी करून महावितरणचे नुकसान केले. त्यानुसार वीज अधिनियम कायदा 2003 सुधारित कायदा 2007 चे कलम 135 अन्वये रामचंद्र भागोजी बुदार व राकेश रामचंद्र बुदार यांच्या वरती दिलेल्या चोरीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक तपास चिपळूण पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक विकास निकम करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChiplunचिपळुण