शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका,महिलांचा कौल महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 11:58 IST

Grampanchyat Elecation Rajapur- राजापूर तालुक्यातील १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून आपापली ताकद आजमावली जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देराजापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका,महिलांचा कौल महत्त्वाचा जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात मिळण्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी

राजापूर : तालुक्यातील १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून आपापली ताकद आजमावली जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या मतदारांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची ३ हजार ५११ एवढी मतदारसंख्या जास्त आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यातील उमेदवारांच्या भवितव्याची दोरी महिलांच्या हाती राहणार आहे.मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार कोरोनामुळे प्रशासकांच्या हाती देण्यात आला होता. कोरोनामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये १५६ प्रभागातील ३९९ जागांसाठी लढत होणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून सुरूवात झाली आहे.१५ जानेवारीला मतदान होणार आहे. ग्रामीण भागातील राजकारणावरील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने या ग्रामपंचायत निवडणुकीला राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या करीत आपापल्या पक्षाचे पॅनेल उभे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामध्ये काही गावांमधील मोजक्याच राजकीय पक्षांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे.या निवडणुकीमध्ये ५४ हजार ६८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये २५ हजार ५८९ पुरूष, तर २९ हजार १०० महिला मतदारांचा समावेश आहे. पुरूष मतदारांच्या तुलनेत ३ हजार ५११ महिला मतदारांची संख्या जास्त आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यातील उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांच्या हातामध्ये राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला मतदारांना मतदानासाठी उद्युक्त करण्याचे आव्हान राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसमोर राहणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकWomenमहिलाVotingमतदान