शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यात कामच नाही, मी भाजपमुक्त : रमेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 14:17 IST

भाजपात जावून आठ महिने झाल्येत, कोणतेही काम नाही की जबाबदारी नाही, फक्त बसवून ठेवले आहे . कोणत्याही सभेला, बैठकीला बोलावणे नाही त्यामुळे जर आपली किंमतच नसेल तर राहून तरी काय करणार ? यास्तव पक्ष सदस्य नसल्याने मी भाजपमुक्त होत आहे अशी घोषणा माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत आज केली

ठळक मुद्देकार्यकर्ते सांगतील ती दिशा ठरविणार : रमेश कदमपालिकेत भ्रष्टाचार- आम्ही पापाचे धनी होणार नाही सत्तेत पाठिंबा नाही, सारे गैरव्यवहार खणून काढणारलवकरच कार्यकर्त्यंचा आणि हितचिंतकाचा मेळावा घेणार

चिपळूण, 11 : भाजपात जावून आठ महिने झाल्येत, कोणतेही काम नाही की जबाबदारी नाही, फक्त बसवून ठेवले आहे . कोणत्याही सभेला, बैठकीला बोलावणे नाही त्यामुळे जर आपली किंमतच नसेल तर राहून तरी काय करणार ? यास्तव पक्ष सदस्य नसल्याने मी भाजपमुक्त होत आहे अशी घोषणा माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत आज केलीआपणाच लवकरच कार्यकर्त्यंचा आणि हितचिंतकाचा मेळावा घेणार आहोत असे सांगतानाच कोणत्या पक्षात जाणार आहोत याचा अद्याप विचार केला नसल्याचे कदम यांनी स्यष्ट केले.  यावेळी त्यांनी नगरपालीकेच्या कारभारावार टीका केली.

लोकांची कामे होत नसतील आणि विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचारच होत असेल तर आपण यावर आक्रमक होवून पावले उचलू. परिवर्तनच्या नावाखाली हे सत्तेवर आले व लाखो रुपयांचा टेंडर घोटाळा सुरू आहे , हे मी पाहतो आहे, त्यामुळे आमच्या नगरसेवकांचा गट स्वतंत्र आहे तो यांना पाठींबा देणार नाही. प्रामाणिक व विधायक काम असेल तर जरुर विचार करू मात्र आजपासून आम्ही नगरपालीकेत स्वतंत्र आहोत असेही  कदम यांनी सांगितले.लोकांना साध पाणी व्यवस्थित मिळत नाही, भुयारी गटारांसारख्या फसव्या योजना विकासाच्या नावाखाली आणल्याचे सांगितले जाते पण हे सारे चुकीच असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.