शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करा, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

By अरुण आडिवरेकर | Updated: July 24, 2023 16:47 IST

पोलिसांनी लक्ष घालून अंमली पदार्थ विक्रेते, वाहक यांच्यावर कारवाई करावी

रत्नागिरी : अंमली पदार्थांचे जिल्ह्यातून समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वच विभागांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केली.एनसीओआरडी अर्थात अंमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक सोमवारी (२४ जुलै) घेण्यात आली. बैठकीला पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, निरीक्षक जनार्दन परबकर, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहायक आयुक्त यादव गायकवाड, मत्स्योत्पादनाचे सहायक आयुक्त अभयसिंह इनामदार, जिल्हा बंदर अधिकारी वाय. आर. कुलकर्णी, चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक लक्ष्मीकांत भातकर उपस्थित होते.पोलिस निरीक्षक भातकर यांनी विषय वाचन करुन आढावा दिला. जिल्हाधिकारी सिंह यांनी सांगितले की, पोलिस उपअधीक्षक, उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष घालून अंमली पदार्थ विक्रेते, वाहक यांच्यावर कारवाई करावी. कृषी विभाग, वन विभागांनी अंमली पदार्थ विशेषत: गांजा लागवडीबाबत दक्ष रहावे. तशी माहिती मिळताच पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करावी. नशामुक्ती केंद्र स्थापन करण्यासाठी आणि शाळा, महाविद्यालयात अंमली पदार्थांच्या उच्चाटनासाठी जनजागृती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सिंह यांनी केली.पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी ही जनजागृती व कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. या बैठकीला क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय अधिकारी, पोलिस उपअधीक्षक आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी