शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीबाप्पांच्या आगमनाची आतुरता, रत्नागिरीत मुर्तीकारांमध्ये कामाची लगबग 

By मेहरून नाकाडे | Updated: September 9, 2023 16:18 IST

रत्नागिरी : वर्षभर ज्याच्या आगमनाची आतुरता लागते त्या लाडक्या गणपतीबाप्पांच्या स्वागतासाठी अवघा भक्तगण आतूर झाला आहे. दहा दिवसांची प्रतिक्षा ...

रत्नागिरी : वर्षभर ज्याच्या आगमनाची आतुरता लागते त्या लाडक्या गणपतीबाप्पांच्या स्वागतासाठी अवघा भक्तगण आतूर झाला आहे. दहा दिवसांची प्रतिक्षा असली तरी लाडक्या बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या एक दोन दिवस आधी भाविक गणेश मूर्ती घरी नेण्यात येत असल्याने गणेशमूर्ती शाळेत कामाची लगबग सुरू झाली आहे.थर्माकोल, प्लास्टिक बंदी असली तरी त्याला पर्यायी सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध असून विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्यापासून मखर, सजावटीचे तसेच पूजेच्या साहित्य खरेदी भाविकांनी सुरू केली आहे. घरगुती गणेशोत्सवापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सरसावले आहेत. घरोघरीसुध्दा साफसफाई, रंगरंगोटीची तयारी सुरू झाली आहे. बाजारात कोल्हापूर, पेण येथून तयार गणेशमूर्ती विक्रीस आल्या आहेत. अगदी पाच इंचापासून तीन, चार फूटी मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गणेश मूर्तीशाळेतील मूर्तीकारांची सर्वाधिक घाई सुरू आहे. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी रात्रपाळी करण्यात येत आहे. गावामध्ये पाट नेवून द्यायची पध्दत आहे. तयार गणेशमूर्तीना वाढती मागणी आहे. पाचशे रूपयांपासून सहा, सात हजारापर्यत मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इंधनाचे दरातील वाढ शिवाय माती, रंगाचे दरात वाढ झाली आहे. मजूरीही वाढली असल्याने मूर्तीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी गणेशमूर्तींच्या किंमतीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.गणेशमूर्ती तयार करताना कोरीव, रेखीव काम असल्याने रंगकामासाठी वेळ लागत आहे. वेळेत रंगकाम आवरण्यासाठी माणसांची कमतरता भासत असल्याने कुटूंबातील सर्व सदस्य कामात व्यस्त झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी