रत्नागिरी : कोरोना महामारीमुळे बंद असलेली लोकमान्य टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम दरम्यान चालविण्यात येणारी दुरांतो सुपरफास्ट स्पेशल गाडी येत्या १० जुलैपासून पुन्हा कोकण रेल्वे मार्गे धावणार आहे.
गाडी क्र. ०१२२३/०१२२४ लो. टिळक टर्मिनस ते एर्नाकुलम सुपरफास्ट गाडी १० जुलैपासून पुढील सूचना मिळेपर्यंत मंगळवार तसेच शनिवारी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी एर्नाकुलमला सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी (०१२२४) एर्नाकुलमहून ११ जुलैपासून दर बुधवार तसेच रविवारी मुंबईसाठी सुटणार आहे. ही गाडी एर्नाकुलमहून रात्री ९.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ९.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथे पोहोचेल.
कोरोना महामारीमुळे ही गाडी अनेक महिन्यांपासून बंद होती. आता हळूहळू रेल्वे सेवा पूर्ववत होऊ लागल्याने ही गाडी पुन्हा कोकण रेल्वेमार्गे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोकण रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.