शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोर्ले येथे नदीत बुडून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: May 7, 2017 23:41 IST

कोर्ले येथे नदीत बुडून दोघांचा मृत्यू

 लोकमत न्यूज नेटवर्कलांजा : लग्नाची फोटोग्राफी करण्यासाठी तालुक्यातील कोर्ले येथे मुंबईहून आलेल्या चार युवकांपैकी दोन युवकांचा नदीच्या पात्राचा अंदाज न आल्याने बुडुन मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. तालुक्यातील कोर्ले गावातील अरुण महिपत साळुंखे यांच्याकडे सोमवारी (दि. ८ मे) विवाहसमारंभ आहे. या सोहळ्याची फोटोग्राफी करण्यासाठी मुंबईहून बंडू रमेश जाला (वय १९) व मुकेश पालाजी मकवाणा (३२, दोघेही जोगेश्वरी, मुंबई) व त्यांचे साथीदार अल्पेश रमेश परमार व रणजित शैलेश रॉय (जोगेश्वरी) हे रविवारी सकाळी ९ वाजता कोर्ले येथे आले होते. त्यानंतर हे चौघेजण जवळच असलेल्या मुचकुंदी नदीवर जांगलदेव कातळकोंड येथे सकाळी १० वाजता पोहण्यासाठी गेले होते. त्यामधील बंडू जाला व मुकेश मकवाणा हे दोघे नदीच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने बुडू लागले. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र अल्पेश व रणजित यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना हे दोघे मित्र किती खोल पाण्यात गेले याचा अंदाज न आल्याने भयभीत होऊन त्यांनी आरडाओरड सुरू केली.जवळून जाणाऱ्या एका रिक्षावाल्याने ही घटना पाहिली. आपल्या जिवाची पर्वा न करता त्याने नदीमध्ये उडी मारून दोघांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. नदीच्या पाण्यामध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू ओढवला होता. याबाबतची माहिती मिळताच, अरुण साळुंखे यांनी आपल्या सहकारी व गावकऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली व तेथून या दोन्ही युवकांना घेऊन भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोहर चिखली, हेडकॉन्स्टेबल सुनील चवेकर, शशिकांत सावंत, राजेंद्र पवार, चालक सतिश साळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. येगाव येथे एकाचा बुडून मृत्यूभाचीच्या लग्नाला आलेल्या मामाचा नदीत बडून मुत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ८़१५ वाजण्याचा सुमारास संगमेश्वर तालुक्यातील येगाव येथे घडली़ सुनील भागूराम पवार असे त्यांचे नाव असून या घटनेची नोंद सावर्डे पोलीस स्थानकात करण्यात आली आहे़ सुनील पवार हे वंदना विजय जाधव (येगाव) हिच्या मुलीच्या लग्नसमारंभासाठी येगाव येथे आले होते़