शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मालकाच्या गाडीवर ड्रायव्हरची ऐश

By admin | Updated: June 5, 2015 00:15 IST

रत्नागिरीत कारवाई : सातारा पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

सातारा : गाडीतून मालक लघुशंकेसाठी उतरला असता ड्रायव्हरने गाडी चोरून नेली. मालकाची लाखोंची रक्कमही गाडीतच. या रकमेतून ड्रायव्हर रत्नागिरीत ऐशारामात राहू लागला. पण अखेर पोलिसांचे हात त्याच्यापर्यंत पोहोचलेच. मालकाची कार आणि त्याच्या पैशातून ड्रायव्हरने खरेदी केलेल्या महागड्या वस्तूंसमवेत सातारा पोलिसांनी त्याला अटक केली. दि. १५ एप्रिल रोजी कोल्हापूरचे कपड्यांचे व्यापारी राकेश जयरामदास बसनतानी (वय ४०, रा. गांधीनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) त्यांच्या गाडीतून (एमएच ०९ डीए २८१९) सातारा येथे आले होते. सातारा व अन्य ठिकाणाहून केलेली व्यापारातील वसुलीची सहा लाख पन्नास हजार रुपयांची रक्कम कारमध्ये घेऊन ते कोल्हापूरकडे निघाले होते. गोडोलीजवळ ते लघुशंकेसाठी थांबले असता त्यांचा ड्रायव्हर अनिस शेख (रा. रुकडी, कोल्हापूर) हा त्यांना न सांगता रोख रकमेसह कार घेऊन परागंदा झाला होता. बसनतानी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.अनिस शेख हा चोरलेल्या पैशांतून गृहोपयोगी वस्तू, दागदागिने, मोटारसायकल खरेदी करून रत्नागिरीत मौजमजा करीत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांना खबऱ्यामार्फत मिळाली. मुठाणे यांनी तातडीने उपनिरीक्षक आर. के. कसबेकर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेतील जवानांना बोलावून सूचना केल्या आणि रत्नागिरीस जाऊन अनिसला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. कसबेकर आणि कर्मचाऱ्यांनी रत्नागिरीत जाऊन सापळा रचला आणि अनिसलाल ताब्यात घेतले. त्याच्याकडून मालकाची चोरलेली कार तसेच एक लाख ५३ हजारांच्या गृहोपयोगी वस्तू, मोटारसायकल, दागदागिने, एलसीडी, सोफासेट, फ्रिज, व विमानाची तिकिटेही जप्त केली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या कामगिरीबद्दल पोलिसांच्या टीमचे कौतुक केले. (प्रतिनिधी)