शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जिल्ह्यातील शिवसेना आमदारांच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 10:30 IST

उत्तर रत्नागिरीमधील शिवसेनेच्या एका आमदाराचा चालक कांदिवलीवरून जामगे येथे आलेल्या वाहन चालक कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहिती वरून कळंबणी येथील रुग्णालय मध्ये संशयीत म्हणून दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्हा द्विशतकाच्या उंबरठ्यावरकोरोनाबाधितांची संख्या १९५, आणखीन १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

रत्नागिरी : उत्तर रत्नागिरीमधील शिवसेनेच्या एका आमदाराचा चालक कांदिवलीवरून जामगे येथे आलेल्या वाहन चालक कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहिती वरून कळंबणी येथील रुग्णालय मध्ये संशयीत म्हणून दाखल करण्यात आले होते.जिल्ह्यात बुधवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये आणखीन १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९५ इतकी झाली आहे.

एकवेळ ग्रीन झोनकडे वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये रत्नागिरीतील ६, कळंबणीतील ३, आणि राजापूर तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे.रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या ६ रुग्णांमध्ये दोन स्त्रिया आणि चार पुरुष आहेत. ४५ वर्षांची एक स्त्री मजगाव रोडची रहिवासी असून, ठाण्यातून आली आहे. ४४ वर्षांची स्त्री साखरप्यातील मुरलीधर आळीतील असून, तीही मुंबईतून आली आहे. ६२ वर्षांचा एक पुरुष भंडारपुळे (रत्नागिरी) येथील, ५७ वर्षांचा एक पुरुष उक्षी वरची वाडी (संगमेश्वर) येथील २७ वर्षांचा एक पुरुष आगवे (लांजा) येथील, तर २५ वर्षांचा एक पुरुष साखरपा-देवळे (संगमेश्वर) येथील आहे. हे सर्व जण मुंबईतून आले आहेत.त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १९५ वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ११४ आहे. सर्व जण रत्नागिरीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत.बुधवारी रात्री आलेल्या तपासणी अहवालात कांदिवलीवरून जामगे येथे प्रवास केलेल्या चालकाचा समावेश आहे. दरम्यान, या चालकाचा तसा प्रत्यक्ष संबंध त्या लोकप्रतिनिधीशी आलेला नाही. त्यामुळे त्या लोकप्रतिनिधीना कोणताही धोका नाही.

हे लोकप्रतिनिधी विद्यमान सरकारमधील लोकप्रतिनिधी आहेत. पण लॉकडाऊन झाल्यापासून तो चालक आमदारांच्या गाडीवर नव्हता, असे सांगण्यात येत आहे. कळंबणी येथील रुग्णालयात तो चालक दाखल होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी