दापोलीत ड्रॅगन प्राईडचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:31 AM2021-04-11T04:31:40+5:302021-04-11T04:31:40+5:30

दापोली : तालुक्यातील गुडघे येथील रहिवासी प्रमोद दांडेकर यांनी १० गुंठ्यात अमेरिकन असलेल्या ड्रँगन प्राईड या फळ झाडांची लागवड ...

Dragon Pride experiment in Dapoli successful | दापोलीत ड्रॅगन प्राईडचा प्रयोग यशस्वी

दापोलीत ड्रॅगन प्राईडचा प्रयोग यशस्वी

Next

दापोली : तालुक्यातील गुडघे येथील रहिवासी प्रमोद दांडेकर यांनी १० गुंठ्यात अमेरिकन असलेल्या ड्रँगन प्राईड या फळ झाडांची लागवड केली. हे फळ अमेरिकेचं असल्यामुळे अनेकांना त्या बद्दल शंका होतीच; परंतु दांडेकर यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. ड्रँगर प्राईड या फळाचे दापोलीत दांडेकर हे एकमेव प्रयोगशील शेतकरी ठरले आहेत.

ड्रॅगन प्राईड हे अमेरिका ते थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बांगलादेश या ठिकाणी यशस्वीरित्या व्यापारी पीक म्हणून घेतले जाते. मात्र या पिकाला अमेरिकन पीक म्हणून देखील संबोधित केले जाते. आधुनिक ड्रॅगन प्राईड सध्या तरी भारतात मोठ्या प्रमाणावर लागवड होत नसल्याने श्रीलंका व चीनमधून आयात केले जाते. हे फळ वर्षभर उपलब्ध असते. पारंपरिक पिकांशिवाय विशिष्ट वनस्पतीसुद्धा शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकतात, याचे हे चांगले उदाहरण दांडेकर यांनी दापोलीकरांच्या समोर ठेवले आहे. या फळ झाडाला कमी प्रमाणात पाणी लागते. तसेच नैसर्गिक खते द्यावीत. या फळाची फळधारणा जून महिन्यापासून होत असल्याचे श्री. दांडेकर यांनी सांगितले. आतून पांढरे असणाऱ्या फळाला १३० रुपये किलो सध्या दर असून आतून लाल असणाऱ्या फळाला २६० रुपये दर मिळत आहे. झाडांची लागवड केल्यानंतर १ वर्षांनी फळधारणा होण्यास सुरुवात होते. २५ वर्ष या झाडांपासून शेतकरी उत्पन्न घेऊ शकतो. जर १ एकर मध्ये ही बाग करण्याकरिता २ ते २.५० लाखांचा खर्च येतो. या फळांच्या मार्फत लाखोंचे उत्पन्न आपण मिळवू शकतो. ड्रँगन प्राईड या झाडाची रोपे सोलापूर व कराड येथे उपलब्ध होत असल्याचेही दांडेकर यांनी सांगितले.

Web Title: Dragon Pride experiment in Dapoli successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.