शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे ‘करो या मरो’ आंदोलन

By admin | Updated: June 21, 2017 01:06 IST

मागण्या प्रलंबित... : केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनाला हरताळ

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तिला कोकण रेल्वेत नोकरी देऊन सामावून घेतले जाईल, या केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या अन्य मागण्याही प्रलंबित असून, या अन्यायाविरोधात कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीने ‘करो या मरो’ असा लढा देण्याचा निर्धार केला आहे. या मागण्यांबाबत एक निवेदन समितीने मंगळवारी कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक बाळासाहेब निकम यांना दिले. आठवडाभरात समितीशी चर्चा करण्याचे आश्वासन निकम यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. समितीचे अध्यक्ष एस. पी. चव्हाण व सचिव अमोल सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी रेल्वे अधिकारी निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २५ वर्षांत रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे २२,५०० प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झाला आहे. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तिला रेल्वेत सामावून घेण्याचे धोरण ठरलेले असताना एकाच सातबारा उताऱ्यावरील चार, सात व बारा जणांची भरती कोकण रेल्वेत केली गेली आहे, असे माहिती अधिकाराखाली घेतलेल्या माहितीमध्ये उघड झाले आहे. भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार तरी होत आहे, असा आरोप समितीने केला आहे. कोकण रेल्वेने घोषित केलेल्या कोकणातील २२,४९१ प्रकल्पग्रस्तांपैकी २६८६ प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिल्याचा चुकीचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात ५००पेक्षाही कमी प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेने सेवेत सामावून घेतले आहे. कोकण रेल्वेच्या आकडेवारीनुसार रेल्वेत ४८२५ कर्मचाऱ्यांची भरती केली. त्यामध्ये कर्नाटक व गोवा राज्यातील कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. सन २००१पासून आजपर्यंतच्या कालावधीत प्रकल्पग्रस्तांपैकी वैद्यकीय तपासणी व तोंडी मुलाखत झाल्यावर दोन ते तीन आठवड्यात नियुक्तीपत्र मिळेल, असे सांगितलेले व समितीकडे नोंद असलेले १८ उमेदवार आजही नियुक्तीपत्र कधीना कधी मिळेल, या प्रतीक्षेत आहेत. केवळ वैद्यकीय तपासणीपर्यंत निवड प्रक्रियेत सामावून घेण्यात आलेले व शारीरिक क्षमता चाचणीत यशस्वी झालेले या संस्थेमध्ये नोंद असलेले ६२ उमेदवारही तोंडी मुलाखत पत्राची वाट पाहात आहेत. लेखी परीक्षेला बसलेल्या मात्र त्यानंतर कोणताही पत्रव्यवहार न झालेल्या ७४ उमेदवारांचे भवितव्य काय, असा सवालही समितीने केला आहे. प्रकल्पग्रस्त असूनही, नोकरीसाठी अर्ज केलेले व पात्रता पदाची जाहीरात निघाल्यावर अर्ज करण्याची मानसिकता असलेले २१७ उमेदवार आज समितीकडे न्याय मागत आहेत. लेखी परीक्षा, वैद्यकीय चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखत झालेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी प्रसिध्द केली जात नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील क्रमवारी कळू शकत नाही व त्याचा गैरफायदा घेऊन भरती प्रक्रीयेत अयोग्य मार्गाचा अवलंब केला जात असल्याचा आरोप समितीने केला आहे.