शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गावात 'मोदी रथ' फिरवू नका!, चिवेलीच्या सरपंचाचे थेट तहसीलदारांना पत्र

By संदीप बांद्रे | Updated: December 26, 2023 16:23 IST

चिपळूण : केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहोचाव्यात, त्याबाबत जागृती व्हावी. यासाठी गावा-गावातून विकासीत भारत संकल्प यात्रेचा रथ फिरवला ...

चिपळूण : केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहोचाव्यात, त्याबाबत जागृती व्हावी. यासाठी गावा-गावातून विकासीत भारत संकल्प यात्रेचा रथ फिरवला जात आहे. केंद्र सरकारच्या या योजना असल्या तरी रथ यात्रेतून मोदी सरकारचा गवगवा सुरू आहे. रथ यात्रेत गावचे तलाठी, ग्रामसेवकच योजनांची माहिती देतात. ही माहिती गावात ग्रामसभा घेऊन देता येऊ शकते. त्यामुळे जतनेच्या पैशातून विशिष्ट पक्षाचाच उदो उदो केला जात असल्याचा आक्षेप ग्रामपंचायतींनी घेण्यास सुरवात केली आहे. याबाबत चिवेलीच्या सरपंचानी थेट तहसीलदारांना लेखी पत्र देत गावात रथ न फिरवण्याची मागणी केली.गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ फिरू लागला आहे. मात्र या रथ यात्रेतून मोदी सरकारचा गवगवा केला जात असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमांतर्गत विविध योजनांबाबत माहिती दिली जाते. रथयात्रेसोबत नोडल अधिकारी येतात. परंतू गाव स्तरावरील ग्रामसेवक, तलाठी कृषी सहायक हे योजनांची माहिती देतात. जिल्हा परिषद तसेच जिल्हा प्रशासनाकडून लोक जमविण्याचे आदेश असल्याने ना-ना शकला लढवून लोकांना निमंत्रीत करण्याचा प्रकार सुरू आहे. 

ग्रामस्थांना शंका केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही योजना असोत. त्याबाबत नियमीतपणेच गावस्तरावर त्या-त्या यंत्रणेकडून माहिती दिली जाते. रथ यात्रेतून दांडोरा पिटण्यापेक्षा ग्रामसभा आयोजित करून देखील सविस्तर चर्चा होऊ शकते, शेतकरी, ग्रामस्थ, महिला, अथवा युवकांच्या शंकाचे निरसन केले जाऊ शकते. मात्र ही रथ यात्रा आगामी निवडणुकांची चाहूल असल्याची शंका ग्रामस्थ गावोगावी घेऊ लागले आहेत.

ग्रामपंचायत चिवेली कार्यक्षेत्रात २२ डिसेंबरला भारत सरकारच्या योजनेंच्या आलेल्या रथामध्ये भारत सरकारचा उल्लेख न करता मोदी सरकार असा उल्लेख केला आहे. ही रथयात्रा गोरगरिब जनतेच्या पैशाचा हा वैयक्तीक नावाने फिरवला जातोय. हे चुकीच्या पद्धतीने सुरू असून शासनाने व्यक्तीच्या अथवा विशिष्ट पक्षाच्या जाहीरातबाजीसाठी जनतेच्या पैशाची लूटमार होत असल्याचे जाणवते. अशा प्रकारच्या जाहीरातीबाबत निषेध आहे. - योगेश शिर्के, सरपंच चिवेली, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCentral Governmentकेंद्र सरकारgram panchayatग्राम पंचायत