शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास, महाविकास आघाडीला अखेर यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 19:35 IST

नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना बडतर्फ करण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने अखेर उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात यश मिळवले आहे.

ठळक मुद्दे चिपळूण उपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास, महाविकास आघाडीला अखेर यश आघाडीच्या २२ नगरसेवकांकडून ठराव मंजूर

चिपळूण : नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना बडतर्फ करण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने अखेर उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात यश मिळवले आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या विशेष सभेत महाविकास आघाडीच्या २२ नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केला. भोजने यांचा दोष दाखवा, अशी भाजप नगरसेवकांची मागणी थेट मतदानामुळे आपोआपच फेटाळली गेली.महाविकास आघाडीच्या २२ नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष भोजने यांच्यावर अविश्वास ठरावासाठी विशेष सभेची मागणी केली होती. गुरुवारी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

सभेच्या सुरुवातीलाच भाजपचे स्वीकृत नगरसेवक विजय चितळे यांनी आघाडीचा अविश्वास ठराव फेटाळून लावण्याची मागणी केली. भोजने यांच्याविरोधात कोणताही ठोस आरोप नाही. त्यांनी कोणता गैरव्यवहार किंवा गैरवर्तनाचा ठोस पुरावाही नाही. केवळ बहुमत आहे म्हणून उन्मत्त होऊन ठराव करता येणार नाही. त्यांचा परिपूर्ण प्रस्ताव येईपर्यंत हा प्रस्ताव स्वीकारु नये, अशी मागणी चितळे यांनी केली.नगरसेवक मोहन मिरगल, राजेश केळसकर, शशिकांत मोदी, सुधीर शिंदे व बिलाल पालकर यांनी स्पष्टीकरण करण्याची गरज नाही किंवा कायद्यातही तशी तरतूद नसल्याचे सांगितले. मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार अखेर अविश्वास ठराव मांडण्यात आला.ऐतिहासिक ठरावचिपळूण नगर परिषदच्या इतिहासात आजपर्यंत असा अविश्वास ठराव मांडण्यात आला नव्हता. या सभेला उपनगराध्यक्ष भोजने अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितच नगरसेवक केळसकर यांनी ठराव मांडला. त्याला नगरसेविका फैरोजा मोडक यांनी अनुमोदन दिले. महाविकास आघाडीतर्फे २२, तर ठरावाविरोधात ४ मते पडली.मागणी पत्राचे वाचन नाहीचया सभेवर भोजने यांनी आक्षेप घेतला होता. ही सभा रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. बाजू मांडण्याची संधी न देता, कायदेशीर नोटीस न पाठवता अविश्वास ठरावावर मतदान करण्यासाठी थेट विशेष सभा बोलावणे बेकायदेशीर आहे. याबाबत अनेक प्रश्न भोजने यांनी उपस्थित केले होते. मात्र, त्यांच्या पत्राचे वाचन झाले नाही.

टॅग्स :Chiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरी