शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धूप प्रतिबंधक बंधाºयासाठी ग्रामस्थ आक्रमक -निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:33 IST

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर असलेल्या मुरूडवाडा येथील कायमस्वरूपी धूप बंधाºयासाठी या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरूवारी ...

ठळक मुद्देयेत्या काही दिवसांत या कामास सुरूवात करावी. अधिवेशनापुर्वी हे काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण होऊन शासनाविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर असलेल्या मुरूडवाडा येथील कायमस्वरूपी धूप बंधाºयासाठी या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरूवारी झाडगांव, मुरूगवाडा, १५ माड कोंड ते भाटिमिºया, जाकिमिºया येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन या समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

गेली ४० वर्षे या भागातील समुद्र किनाºयांची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. भगवतीबंदर येथील ब्रेक वॉटर वॉल अपूर्ण अवस्थेत आहे. ही वॉल १९६७ साली बांधण्यास सुरूवात झाली तेव्हापासून मिºया किनाºयाची धूप होण्यास १९७२, ७३ सालापासून सुरूवात झाली. तसेच ग्रामस्थांचा विरोध डावलून  मिरकरवाडा टप्पा क्रमांक २ बांधताना समुद्रात दगडी भिंत बांधण्यात आली आहे.

या कारणांमुळे आजतागायत प्रत्येक पावसाळ्यात धूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे मानवी वस्तीत पाणी येत असल्याने या परिसरातील अनेक घरांना धोका निर्माण होतो. तसेच ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. गेल्या दोन वर्षात ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानाबाबत कोणतीच भरपाई नागरिकांना मिळालेली नाही. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने, निवेदने देऊनही यावर कोणताच तोडगा निघालेला नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टप्पा क्रमांक २ मुळे या गावांमध्ये समुद्राचे अतिक्रमण होत आहे. यासाठी दगडाचा बंधारा बंद करून टेट्रापॉड टाकून कायमस्वरूपी बंधारा व्हावा. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा तसेच हे काम होईपर्यंत टप्पा क्र. २चे दगडी बंधारा बांधण्याचे काम थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

येत्या काही दिवसांत या कामास सुरूवात करावी. अधिवेशनापुर्वी हे काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण होऊन शासनाविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

या आंदोलनात आप्पा वांदरकर, राकेश नागवेकर, चंद्रशेखर पाटील, ग्रामपंचायत सदस्य तन्मया शिवलकर, तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, प्रमोद नार्वेकर, रूपेश सनगरे, राजेंद्र बनप, ययाती शिवलकर, मीरा पिलणकर, अ‍ॅड. संजय पोकडे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStrikeसंप